Tuesday 13 December 2016

मोदींच्या निर्णयाने ‘बड्या’ लोकांचा बालही बाका झाला नाही - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 - 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून सातत्याने आपल्याच सरकार विरोधात भूमिका घेणा-या शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. नोटाबंदी’च्या निर्णयानंतर जे कोणी काळा पैसा खतम केल्याचे फुटके ढोल वाजवीत आहेत त्यांना जमिनी हकीकत माहीत नाही. महाराष्ट्र, हैदराबाद, चेन्नई, गुजरात, बंगळुरू येथे आतापर्यंत पडलेल्या धाडीत शेकडो कोटींच्या गुलाबी नोटांचे घबाड जप्त होणे हे काही चांगले लक्षण नाही. 
 
पंतप्रधान मोदी यांनी १० डिसेंबरला गुजरात येथील बनासकांटा येथे भाषण करताना सांगितले, ‘‘पन्नास दिवसांनंतर पहा, धिरे… धिरे… धिरे… परिस्थिती सुधर जायेगी.’’ पंतप्रधानांचे म्हणणे पन्नास दिवसांआधीच खरे ठरताना दिसत आहे. गरीबांची परिस्थिती वाईटाहून वाईट होत असताना ‘बड्या’ लोकांचा बालही बाका झाल्याचे दिसत नाही. त्यांच्याकडे दोन हजारांचे गुलाबी ढीग रोजच वाढत आहेत. त्यालाच परिस्थिती ‘सुधारणे’ असे समजावे काय? असे उद्धव यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...