Friday 16 December 2016

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली, दि. 16 - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपये 21 पैशांना वाढ करण्यात आली असून डिझेलच्या किंमतीत 1 रुपये 79 पैशांची वाढ करण्यात आली आहे.  मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
 

तेल उत्पादक व निर्यातदार देश (ओपेक) पुढील महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करणार आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती आगामी तीन ते चार महिन्यांत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. याशिवाय तेल शुद्धीकरण कंपन्यांचा नफाही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
 
आगामी तीन ते चार महिन्यांत पेट्रोलचे दर ५ ते ८ टक्के, तर डिझेलचे दर ६ ते ८ टक्के वाढतील, असे क्रिसिलने म्हटले आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांचा डिसेंबरच्या तिमाहीतील नफा जवळपास दुपटीने वाढून ६ ते ७ डॉलर प्रतिबॅरल होईल. गेल्या आठवड्यात ओपेक देशांनी क्रूड तेलाचे दररोजचे उत्पादन १.२ दशलक्ष बॅरलनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील तेलाचा पुरवठा कमी होऊन किमती वाढतील. ब्रेंट क्रूड तेलाचे दर मार्च २0१७ पर्यंत ५0 ते ५0 डॉलर प्रति बॅरव होतील. ब्रेंट क्रूडचे दर ६0 डॉलरवर गेल्यास पेट्रोल ८0 रुपये लिटर तर डिझेल ६८ रुपये लिटर होईल
 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...