Saturday 10 December 2016

'मोदी, जयललितांच्या मृत्यूपूर्वीच्या घडामोडींची चौकशी करा'

चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर घडलेल्या घडामोडींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी अशी मागणी तमिळ अभिनेत्री गौतमी यांनी केली आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना गौतमी म्हणाल्या, "मी प्रश्‍न उपस्थित करत नाही. मी फक्त रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यापुढील 75 दिवसांमध्ये नेमके काय काय घडले हे विचारत आहे. मी कोणतीही वैद्यकीय किंवा उपचाराबद्दलची माहिती मागत नाही. डॉक्‍टर आणि रुग्णादरम्यानची कोणतीही गोपनीय गोष्ट मी विचारत नाही. लोकांना सहजपणे भेटणाऱ्या मुख्यमंत्री म्हणून त्या लोकप्रिय होत्या. त्यामुळे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करण्यात काहीही गैर नाही.' यासंदर्भात गौतमी यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "गेल्या काही महिन्यापासून त्या रुग्णालयात दाखल झाल्यापासून अनेक गोष्टी निरुत्तरित राहिल्या आहेत. त्यांची प्रकृती सुधारली आणि अचानक त्यांचे निधन झाले. रुग्णालयत दाखल केल्यानंतरच्या सर्व घडामोडींवर पांघरूण घालण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू ही फार मोठी शोकांतिका आणि अशांत करणारी बाब आहे.'
"रुणालयात असताना कोणालाही त्यांना भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे सदिच्छा देण्यासाठी आलेल्या अनेक मान्यवरांना त्यांना न भेटताच परत जावे लागले होते. तमिळनाडू सरकारचे नेतृत्त्व करत असतानाही त्यांच्याबद्दल एवढी गुप्तता आणि जनतेच्या नेत्या असतानाही त्यांना जनतेपासून दूर का ठेवले जात होते?', असे प्रश्‍नही गौतमी यांनी उपस्थित केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...