Saturday 10 December 2016

राज्यातील 40 हजार बॅंक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कोल्हापूर - निवेदने देण्यापासून ते काळ्या फिती लावून काम करण्यापर्यंत राज्यातील 40 हजार बॅंक कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पाचशे व एक हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर पुरेसे चलन उपलब्ध न झाल्याने बॅंक कर्मचारी-अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक कर्मचारी आजारी पडत असल्याने आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बॅंक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
बॅंकांमध्ये आवश्‍यक तितके पैसे लवकरात लवकर जमा करून बॅंक कर्मचाऱ्यांचा त्रास कमी करावा, अशा मागणीचे निवेदन नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिले आहे. येत्या तीन-चार दिवसांत योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याची दहा डिसेंबरपर्यंत वाट पहिली जाईल, अन्यथा त्यानंतर काळ्या फिती लावून काम केले जाईल. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची धार वाढविली जाईल. राज्यातील सुमारे 40 हजार कर्मचारी व अधिकारी या आंदोलनात सहभागी होतील, असे तुळजापूरकर यांनी सांगितले.
सरकारने पेट्रोल पंप आणि मेडिकलवाल्यांवर विश्‍वास दाखविला; मात्र जिल्हा बॅंकांवर विश्‍वास दाखविला नाही. असेच होत राहिल्यास सहकार मोडीत निघेल. त्याचबरोबर सर्वसमान्य, ग्रामीण भागातील जनतेचा बॅंकांवरील विश्‍वासही उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
संघटनेचे मुद्दे
- बॅटरी बॅकअपसाठीही वीज नसल्यामुळे ग्रामीण भागात एटीएम आणि ऑनलाइन सिस्टिम चालू शकत नाही.
- इंटनरनेट बॅंकिंगसाठी ग्रामीण भागात बीएसएनएलचे नेटवर्क नाही.
- ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहाराबाबत माहिती नाही.
- जन-धन योजनेत 20 दिवसांत 70 टक्के पैसे कसे वाढले?
- कर्जपुरवठा बंद केल्याने अन्य सर्व व्यवहारांवर परिणाम झाला. यातून बॅंका तोट्यात येणार.
- पाचशे, शंभर, पन्नासच्या नोटा तातडीने व्यवहारात याव्यात.
- सध्या बॅंकांत जमणारी रक्कम रिझर्व्ह बॅंकेकडे जमा करण्यास सांगितल्याने त्याचे व्याज बॅंकांना मिळणार नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...