Wednesday 14 December 2016

93 वर्षांच्या पणजोबांनी अय्याशीसाठी महिलांवर उडवले 470 कोटी

न्यूयॉर्क, दि. 12 -  'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' म्हणत ऐन म्हातारपणात तरुण झालेले नमुने आपल्या आसपास सर्रास आढळतात.  पण अमेरिकेतील एका 93 वर्षांच्या पणजोबांनी तर  कमालच केली आहे. पेशाने व्यावसायिक असलेल्या सायमन रेडस्टोन यांनी 93 व्या वर्षीही तोच जुना जोश आणि उत्साह दाखवत महिलांसोबत अय्याशी करण्यासाठी तब्बल 470 कोटींहून अधिक रक्कम उडवली आहे. सायमन यांची माजी प्रेयसी असलेल्या एका महिलेनेच ही बाब उघड केली आहे. 
डेलीमेल या वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. त्या वृत्तनुसार सायमन रेडस्टोन यांनी 45 वर्षीय माजी प्रेयसी सिडनी हॉलेंडविरुद्ध वृद्ध व्यक्तीसोबत गैरवर्तन केल्याचा खटला कॅलिफोर्नियातील न्यायालयात दाखल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सिडनी हॉलेंड हिने सायमनच्या रंगेलपणाची काहाणी न्यायालयासमोर सांगितली. 
रेडस्टोन आणि सिडनी यांची भेट 2010 साली झाली होती. या महिलेसोबत लग्न करून तिच्या तीन वर्षीय मुलीला दत्तक घेण्याचीही तयारी रेडस्टोनने दर्शवली होती. पण पाच वर्षांनंतर त्यांच्यात दुरावा आला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. 
रेडस्टोनने रियालिटी टीव्हीवर निर्माती म्हणून काम पाहणाऱ्या महिलेला 21 दशलक्ष डॉलर (तब्बल 140 कोटी रुपये) दिले. तर एका फ्टाइट अटेंडंटला 18 दशलक्ष डॉलर (120 कोटी रुपये )  आणि तिच्या बहिणीला शय्यासोबत करण्यासाठी 6 दशलक्ष डॉलर (40 कोटी रुपये)  दिल्याचा दावा सिडनी हिने न्यायालयात केला आहे. 
इतकेच नाही तर मेचमेकरमधून भेटलेल्या एका महिलेवर 73.7 कोटी तर एका अन्य प्रेयसीवर 46.9 कोटी रुपये उधळले.  हे कमी म्हणून की काय रेडस्टोनने आपल्या नातवाच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीवरही 40 कोटींची दौलतजादा केली. तर अन्य एका प्रेयसीला नोकरी आणि 10 कोटी रुपये दिले. त्यामुळे सध्या या अय्याश पणजोबांची चर्चा जोरात सुरू आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...