Monday 12 December 2016

ईद ए मिलादच्या दिवशीही गोंदियात दारु दुकाने सुरू


ड्राय डे च्या आदेशाचा प्रशासनाला विसर : मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या



जयस्तंभ चौकात सोमवारी सायंकाळी सुरू असलेले दारुचे दुकान
गोंदिया : आज मुस्लीम बांधवांनी ईद ए मिलाद सण साजरा केला. या दिवशी संपुर्ण विदर्भातील दारुची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. परंतु, गोंदिया जिल्ह्यात दारु दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले नसल्यामुळे आपल्या भावना दुखावल्याची खंत मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली.
शहर तसे हिंदू मुस्लीम एकतेचा परिचय देणारे आहे. परंतु, आज, सोमवारी मुस्लीम बांधवांच्या सर्वात मोठ्या ईद ए मिलाद या सणाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाने दारूची दुकाने बंद न ठेवल्याने मुस्लीम समाज बांधवांच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. संपुर्ण विदर्भात दारु दुकाने बंद असताना गोँदिया जिल्ह्यात मात्र ही दुकाने आज सकाळपासून सुरू होती. जेव्हा शहरातून मुस्लीम बांधवांची मिरवणूक ईदगाहकडे रवाना होत होती. त्यावेळी दारु दुकाने सुरू बघून समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात सुरू असलेल्या दारु दुकानांच्या बंद विषयी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांना विचारणा करण्यातआली असता त्यांनी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याशी संपर्क करण्याची सूचना केली. त्यानंतर ईदच्या दिवशी दारु दुकाने बंद का नाही? यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाने फक्त नऊ सणांच्या दिवशी दारु दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असल्याचे सांगीतले. त्यामध्ये ईद ए मिलादचा समावेश नसल्याचे ते म्हणाले. सोबतच स्थानीक जिल्ह्यात एखाद्या सणाला दारु दुकाने बंद ठेवायची असल्यास जिल्हाधिकारी हे पोलिस प्रशासनाच्या सूचनेवरून दारु दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देतात. परंतु, यावेळी असे निर्देश आपल्या विभागाला जिल्हा प्रशासनाकडून मिळाले नसल्यामुळे दारु दुकाने सुरू होती. तसेच गेल्या वर्षीही दारु दुकाने बंद नव्हते, असे श्री धार्मीक म्हणाले. मुस्लीम बांधवांचा हा सण सर्वात मोठा आहे. या दिवशी देखील  दारुची दुकाने सुरू असल्यामुळे भावना दुखावल्या गेल्याचे मुस्लीम बांधवांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...