Wednesday 14 December 2016

गडचिरोलीच्या सर्व भागात बँकींग सेवेचे जाळे वाढवा -देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 14 :  गडचिरोली जिल्हयाच्या सर्व दुर्गम भागापर्यंत बँकीग सेवा उपलब्ध होतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तंत्रज्ञानाच्या मदतीने सुसज्ज करावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी  आज विधान भवनातील सभागृहात घेतला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास आणि वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्ण गजबे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्याचे  प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी, पालक सचिव विकास खारगे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...