Saturday 10 December 2016

ओबीसींचा एकसंघ हुंकार

नागपूर - ओबीसी बांधवांच्या महामोर्चाने गुरुवारी विधानभवनावर धडक देत अधिकारांसाठी हुंकार भरला. केंद्र आणि राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसह 21 कलमी मागण्या मोर्चेकऱ्यांनी शासनदरबारी मांडल्या. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून हक्क मिळवून घेण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच पिवळ्या टोप्या, पिवळी टी- शर्ट आणि गळ्यात पिवळा दुपट्टा घातलेल्या ओबीसी बांधवांनी काचीपुरा चौकात गर्दी केली होती.
काचीपुरा चौकातून हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर अडविण्यात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पशू, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी मोर्चाला भेट दिली. ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून आपण आलो आहोत, सर्व प्रश्‍नांची जाण आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मागण्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही मंत्रिद्वयींनी दिली.
प्रमुख मागण्या
  • केंद्र व राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असावे
  • ओबीसींची जनगणना जाहीर करा
  • मंडल, नच्चीपन व स्वामिनाथन आयोग लागू करा
  • शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळावी
  • केंद्राची मॅट्रिकोत्तर शंभर टक्के शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना द्या
  • ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करा

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...