Saturday 17 December 2016

तब्बल 2 कोटींच्या नोटाबदली प्रकरणी आरबीआयचे कर्मचारी अटकेत

बंगळुरु, दि. 17 - नोटाबदली प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने बंगळुरुमधून अटकेची कारवाई केली आहे. तब्बल 1 कोटी 99 लाख रुपयांची नोटाबदली या कर्मचा-यांनी करुन दिली होती. नोटाबदली करुन देताना 2000 आणि 100 च्या नोटा या कर्मचा-यांनी दिल्या होत्या. वरिष्ठ विशेष सहाय्यक सदानंदा नाईक आणि रोख विभागातील विशेष सहाय्यक ए के केविन अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. दोन्ही आरोपी कर्मचा-यांनी चार दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. 
 
नोटाबदली प्रकरणात आरबीआयच्या कर्मचा-यांना अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 13 डिसेंबर रोजी सीबीआयने 1 कोटी 51 लाखांच्या जुन्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करणा-या आरबीआय अधिका-याला अटक केली होती. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...