Monday, 12 December 2016

पंजाबमध्ये 'आप'ला धक्का

नवी दिल्ली- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला आज मोठा धक्का बसला. पक्षाचे पंजाब प्रांताचे उपप्रमुख कर्नल सी. एम. लाखनपाल यांनी इतर तीन जणांबरोबर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पंजाब कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लाखनपाल यांसह कर्नल इक्‍बाल पन्नू, पी. के. शर्मा भारपूर सिंग या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वेळी संबंधित चारही पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...