Saturday 17 December 2016

नागपूर हादरले, 24 तासात तीन हत्या

नागपूर, दि.17 - उपराजधानीत गेल्या 24 तासात हत्येच्या तीन घटना घडल्या असून तीन जणांच्या हत्येचे प्रयत्न झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या हिंसक घटनाक्रमाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 
जरीपटक्यातील  गुरूनानक फार्मसी कॉलेजजवळ राहणा-या लवप्रीत कौर गुरूदेवसिंग मोहर (वय 32) यांची त्यांच्या पतीने शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गुरूदेवसिंग कर्नलसिंग मोहर (वय 40 ) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येची दुसरी घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.  नीलेश उर्फ बग्गा कौरोती याच्यावर मुकुंदा, टेंब-या उर्फ राहुल खंडाते, प्रणय कावळे, बबल्या सेंगर आणि त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले.  
 
तिसरी घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी उघडकीस आली. नरसाळा भागात गुड्डू ठाकूर या तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा कापून हत्या केली. ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण दौलत धापोडे (वय 55) याच्यावर  आरोपी अनिल सरोदे याने वस्त-याने हल्ला चढवला. त्यांचा गळा चिरण्याचा आरोपीने प्रयत्न केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...