Wednesday, 7 December 2016

वाघाच्या कातडी तस्करीत पोलिस सूत्रधार


आरोपींच्या नातेवाइकांचा पत्रकार परिषदेत आरोप

देवरी तालुक्यातील प्रकरण

गोंदिया- देवरी पोलिस ठाणेअंतर्गत येणाèया चिचगड रस्त्यावरील सालई गावाच्या शिवारात तस्करी होत असलेल्या वाघ कातडी व अवयव विक्री प्रकरणात दीपक कोरे नामक पोलिस कर्मचारीच मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप या प्रकरणात आरोपी ठरलेल्या युवकांच्या नातेवाइकांनी पत्रकार परिषदेत केला.
सुशीला शिवणकर, भरत शिवणकर, माणिक मेंढे, रीना सलामे , यादोराव भेंडारकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील काही रहस्यांवरील पडदा उचलला.आमची मुले आरोपी असल्यास त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईलच. परंतु, यात मुख्य सूत्रधाराला का वगळण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सालई गावाच्या शिवारात सापडलेल्या वाघ कातडी व अन्य साहित्यप्रकरणी आतापर्यंत वनविभागाने २१ आहे. दोन आरोपी फरार आहेत. या सर्वांना न्यायालयीन व वनकोठडीत पाठविण्यात आले. यात आरोपी असलेल्या चार युवकांना कुंभारटोला येथील दीपक भरत कोरे  या पोलिस कर्मचाèयाने पैशाचे आमिष दाखवून संधान साधले. वाघाची कातडी मिळवून देण्यात सहकार्य केले.
प्रत्येकाला एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते, असा आरोप अन्य आरोपींच्या नातेवाइकांनी करतानाच कोरे यांचे नाव चौकशीदरम्यानसुद्धा आले. या तस्करीची चौकशी होत सालेकसा पोलिस ठाण्यात कार्यरत दीपक कोरे याचे बयाण वनविभागाने तब्बल तीन दिवस बोलावून घेतले. परंतु, आरोपपत्रात मात्र कोठेही त्याचा उल्लेख न आल्याने वनविभागाच्या चौकशी अधिकाèयांवर सुद्धा संशयाची शक्यता या नातेवाइकांनी स्पष्ट केली. या मागे आर्थिक कारण असल्याचे उघड होत असताना या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह मुख्य वनसंरक्षक यांचेकडे पाठविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...