Wednesday, 7 December 2016

आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थे

मुंबई, दि. 7 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण आढावा समितीने बुधवारी दुपारी पतधोरण जाहीर केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे विकासावर परिणाम होण्याची शक्यता असतानाही आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयकडून बँकांना दिल्या जाणा-या कर्जाचा व्याजदर (रेपो रेट) 6.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआय व्याजदरात कपात करेल आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती, परंतु ती फोल ठरली. तसेच  रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयने महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...