Thursday 1 December 2016

राजधानी एक्सप्रेसच्या शौचालयात सापडले साडेचार लाख रुपये

भुवनेश्वर, दि. १ - ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून एकाएकी बाद झाल्यानंतर बेहिशोबी रोकडचा हिशोब कसा द्यायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातूनच रोज देशातील विविध भागातून जळालेल्या नोटा सापडल्याच्या बातम्या येत आहेत. काल बुधवारी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या शौचालयात रेल्वे पोलिसांना साडेचार लाखाची रोकड सापडली. 
ही सर्व रोकड ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या चलनामध्ये  होती. चलनातून बाद झालेल्या नोटा अशा प्रकारे सापडण्याची  ओदिशामधील ही पहिली घटना आहे. राजधानी एक्सप्रेसच्या बी-६ डब्ब्याच्या शौचालयातून रेल्वे पोलिसांनी ४.५ लाखाची रोकड ताब्यात घेतली. ही सर्व रक्कम इन्कम टॅक्स अधिका-यांकडे सोपवण्यात आली.  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...