Sunday, 19 November 2017

जूनी पेेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार अग्रवालांची भेट

गोंदिया,19 - महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या गोंदिया जिल्हा शाखेच्या वतीने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा गोंदियाचे आमदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन आज रविवारी (दि.19) देण्यात आले.
आ, अग्रवाल यांच्या त्यांच्या कार्यालयात निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके, सचिन राठोड, चंदू दुर्गे, लिकेश हिरापूरे, शालिक कठाणे,सुपचंद लिल्हारे, प्रितम लाडे,अमोल पाटणकर, मुकुंद तिवारी ,अरविंद डहाट ,सतीश नागपुरे,संजय उके, मनीष बलभद्रे, महेश कोरे ,योगेश देवकते यांचा समावेश होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके आणि आमदार अग्रवाल यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या समस्येविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत आमदार अग्रवाल यांनी शिष्टमंडळाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी संघटना आणि मुख्यमंत्री यांची बैठक लावण्याचे आश्वासन दिले. याशिवाय मुख्य सचिवांशी सुद्धा चर्चा करणार असल्याचे श्री. अग्रवाल यांनी म्हटले असून प्रश्न निकाली लागला नाही तर सभागृहात हा विषय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून लावून धरणार असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...