खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.२३: गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाट खरेदीत शिरलेल्या मध्यप्रदेशातील शिवा गृपच्या व गोंदियातील काही सल़ग्न रेतीमाफियांची यथेच्छ धुलाई बनाथर येथील नागरिकांनी केल्यानंतर शिवागृपच्या कर्मचार्यांनी पळ काढला तर स्थानिक माफियांना ओळखीचा लाभ मिळाल्याने त्यांनीही नमते घेत जिव वाचविण्यातच भले मानले.मार खाणार्यामध्ये सत्ताधारी भाजपचे काही पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.त्यातच या मारहाणीचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोचला मात्र रेतीमाफियाविरुध्द पोलिसांनी कारवाई न करता गावकर्यारच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मारहाणीत बनाथर येथील बहुजन समाजाचा कार्यकर्ता रवि दावने यास मारहाण केली असून गंभीर दुखापत झाली आहे.मारहाण करणारे वाहन क्रमाक एमपी ५४ सी५७५७ या वाहनाने दाखल झाले होते.तिकडे तिरोड्यातील मुंडीकोटा येथे रेतीघाटाला घेऊनच मारहाण झाली तर दुसरीकडे बनाथर येथील घाटावरून गावातील एका इसमाने एक ट्रक्टर रेती नेल्याने त्या इसमाला शिवा गृपच्या गुंडप्रवृत्तीच्या कर्मचार्यानी गावात येऊन मारहाण केली.त्याला मारहाण केल्याची माहिती गावात कळताच गावकरी सर्वांनी गावातील चौकातच नागरिकांनी एकत्र येत त्या ४ जणांची चांगलीच धुलाई केली.त्यात गोंदिया विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका नेत्याच्या खास कार्यकर्त्याची नागरीकांनी धुलाई केल्याने रेतीमाफियात चांगलीच धास्ती भरली आहे.

यापुर्वी गणी खान यांनी तेडवा येथे दादागिरी करीत तलवार चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील नागरिकांनीही चांगलीच धुलाई केली होती.या सर्व प्रकारकडे बघितल्यास रेतीघाटावर गुंडप्रवृत्तीच्या लोंकाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.शिवा गृप हा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा असल्याची चर्चा आहे.सोबतच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील जे काही रेतीघाट आहेत,त्या घाटांच्या खरेदीविक्रीमध्ये एकटी भाजपच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या काही आजी माजी आमदारांची मुले सुध्दा सहभागी असल्याचे बोलले जात असून या रेतीव्यवसायिकाकडून यामध्ये जेवढे लोक सहभागी होतात त्यांच्याकडून अधिकारी व पत्रकारांना पैसा द्यावा लागतो असे सांगून काही निधी गोळा करुन तो वितरीतही झाल्याचे दाखविले जात असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment