आमगाव(महेश मेश्राम),दि.20ः आमगाव तालुका भाजपा महिला आघाडीतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक लक्ष्मणराव मानकर शैक्षणिक संकुल येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला तालुका अध्यक्ष मोहिनी निंबार्ते ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सीता रहांगडाले, सविता पुराम, भावना कदम, सुनंदा उके, योगीता पुंड, अंजली जांभुळकर, सुषमा भुजाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी सावित्री फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महिलांना स्त्री शिक्षणाने बळ मिळाले आहे. सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवन संघर्षाने महिलांना नवी दिशा मिळाली आहे. आधुनिक भारताचे प्रतिनिधीत्व महिलांच्या हाती येत आहे. महिलांनी मिळालेली संधी लोककल्याणासाठी घालावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव सीता रहांगडाले यांनी महिलांना ग्रामपंचायतच्या माध्यमाने मिळालेली संधी भविष्यातील जागतिक प्रतिनिधीत्वाकरिता वाटचाल ठरणार आहे. महिलांनी अधिक सक्षमपणे कर्तबगारीची ओळख निर्माण करावी असे मत व्यक्त केले. भावना कदम, सुनंदा उके यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना नागरिकांनी नवनियुक्त सरपंच व सदस्यांना दिलेल्या कौलाचा जाणीव ठेवून आपली जबाबदारी कर्तव्यदक्षपणे पार पाडण्याचे तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नवनियुक्त महिला सरपंच व सदस्यांना ही मोठी संधी असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले.
संचालन अर्चना चिंचाळकर यांनी केले. यशस्वीतेसाठी ज्योती खोटेले, वंदना मटाले, उमादेवी बिसेन, बबीता मेर्शाम, लिला कठाणे, संगीत वाटकर, नेहा बोपचे, सुषमा भुजाडे यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित महिला सरपंच व सदस्यांचा शाळा, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment