गोरेगाव( गुड्डू पटले),दि.२०ः- गोरेगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुक्यातील नवनिर्वाचित सरंपच,उपसरंपच व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम रविवारला घेण्यात आला.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य सत्कार समारोहाला सामाजिक न्याय मंत्री व पालक मंत्री राजकुमार बडोले, विधान परीषद आमदार डाॅ.परीणय फुके, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले, सभापती दिलीप चौधरी, महिला आघाडी प्रदेश प्रतिनिधी सिता रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष डाॅ.लक्ष्मन भगत, महामंत्री रविकांत बोपचे,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, रेखलाल टेंभरे,किशोर गौतम यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.यावेळी कटंगी बु.येथील सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच यांचा पक्षात प्रवेश करुन त्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते केला.
No comments:
Post a Comment