
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त वसंतदादा सेवा संस्थेने आयोजिलेल्या ‘तीन वर्षांतील फसलेले अर्थकारण’ (नोटाबंदी, जीएसटीचे अपयश) या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर अध्यक्षस्थानी होते.
जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुका अधोरेखित करतानाच पेट्रोलच्या दरात कपात न केल्याबद्दलही सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीका केला. ते म्हणाले, ‘जीएसटीमध्ये कररचनेचे जास्तीत जास्त दोन किंवा तीन दर असायला हवेत. भारतात जीएसटी लागू करताना पाच, सहा दर लागू केले गेले. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या कपातीचा कोणताही फायदा सरकारने नागरिकांना दिला नाही. या इंधनाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमती सरकार आपल्या नियंत्रणात आणू शकत नाही. त्यामुळे भविष्यात इंधनाच्या किमती वाढल्या तर देशाची अर्थव्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही इतकी आपली परिस्थिती नाजूक आहे.’
राज्यातील सरकारला लक्ष्य करताना यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. अवैध संपत्तीचा आरोप असलेले भुजबळ हे एकमेव आहेत का, असा सवाल त्यांनी केला. केवळ महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत म्हणून भुजबळांना वेगळा न्याय लावला जात असेल, तर त्यावर आवाज उठवलाच पाहिजे, असे पटोले म्हणाले.
No comments:
Post a Comment