Thursday, 23 November 2017

नक्षल्यांनी केली पुन्हा एकाची हत्या, दोन दिवसांत तीन खून

गडचिरोली, दि.२३: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी बुधवारी(ता.२२) रात्री धानोरा तालुक्यातील सोडे येथील  येथील एका इसमाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. सुरेश तोफा(४३), असे मृत इसमाचे नाव आहे.बुधवारी रात्री सशस्त्र नक्षलवादी सुरेश तोफा याच्या घरी गेले. त्यांनी सुरेशला झोपेतून उठवून बाहेर नेले आणि कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली. नक्षल्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधले असून, सुरेश हा पोलिसांचा खबऱ्या होता, असे म्हटले आहे. धानोरा तालुक्यात मागील दोन दिवसांत नक्षल्यांनी तीन जणांची हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे. २१ नोव्हेंबरच्या दुपारी पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत झाडापापडा येथे कोंबडा बाजारात  सुनील तिलकबापू पवार या युवकाची गोळ्या घालून हत्या केली. याच रात्री रानवाही येथील जाधव जांगी याचाही नक्षल्यांनी खून केला. यावरुन नक्षल्यांनी आपला मोर्चा धानोरा तालुक्याकडे वळविल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...