Saturday, 18 November 2017

गुजरातमध्ये भाजपचा विडिओ धार्मिक तेढ वाढत असल्याचा आरोप


अहमदाबाद,दि.18-आगामी गुजरात निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने सोशल मीडियावर प्रचारासाठी प्रसिद्ध आलेला नवीन व्हिडीओ सध्या वादात अडकत आहे. भाजपच्या एका नव्या व्हिडीओत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

अहमदाबाद येथील अॅड. गोविंद परमार यांनी भाजपच्या या नव्या व्हिडीओविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. भाजपचा नवा व्हिडीओ हा दोन समाजात तेढ निर्माण करणारा असून धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप परमार यांनी केला आहे.  हा व्हिडीओ मुस्लिम समाजाविरोधात भाष्य करत असून याद्वारे चुकीचा प्रचार होत असल्याचा आरोप ह्युमन राइट्स लॉ नेटवर्कच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या जाहिरातीमुळे मुस्लिमांविरोधात दुष्पप्रचार करण्यात येत असून त्यांच्याविरोधात घृणा निर्माण करण्यात येत असल्याचे गोविंद परमार यांनी म्हटले. याआधीदेखील भाजपच्या एका जाहिरातीत पप्पू शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्यावरदेखील आक्षेप घेण्यात आल्यानंतर तो शब्द वगळण्यात आला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...