चिचगड,दि.21- आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी भागात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या धान खरेदी केंद्रावर पाठविलेला बारदाना एकदम निकृष्ठ दर्जाचा असल्याची ओरड सुरू झाली आहे. हा बारदाना पुरविण्यासाठी आदिवासी महामंडळाने टेंडरप्रक्रिया पूर्ण करून शुभलक्ष्मी इंडस्ट्रीला त्याचे कंत्राट दिले. विशेष म्हणजे यात एकदा वापरण्यात आलेला बारदाना पुन्हा पुरविण्याचा आदेश आहे.
परंतु, आमच्या प्रतिनिधीने जेव्हा खरेदी केंद्राला भेट दिली तेव्हा पुरविलेला बारदाना हा एकदा नव्हे तर चारपाचदा वापरण्यात आल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. यावर आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक आऱ.एम. राजूरकर यांना विचारणा केली असता त्यांनी एकदा वापरण्यात आळेला बारदानाच वापरायचा असून अनेकदा वापरलेला बारदाना वापरू नये अशा सूचना संबंधितांना व अधकतारी यांना दिल्याचे सांगितले. मात्र, धान खरेदी केंद्रावर जो बारदाना वापरला जात आहे. तो अनेकदा वापरलेला असून पदाधिकारी व अधिकारी हे कमिशनच्या नादात अनेकदा वापरलेला बारदाना वापरत असल्याची तक्रार येऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment