Saturday 18 November 2017

काळ्यापैशाविरोधात नोटबंदी हे योग्य पाऊल नव्हे- मनमोहनसिंग


कालेधन से निपटने के लिए नोटबंदी सही कदम नहींः मनमोहन सिंह


कोच्चि,दि.18 (पीटीआई)- नोटबंदीच्या मुद्यावरून माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्ला चढविला आहे. काळ्या पैशाच्या समस्येविरोधात कर, भू-पंजिकरण आणि प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.
अर्नाकुलम येथील मदर टेरेसा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, कर प्रणाली, भू-पंजीकरण आणि प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा केल्या तर काळ्या पैशाविरुद्ध लढाईत यश मिळू शकतो. नोटबंदीसारखी आणिबाणी ही काळ्यापैशाविरुद्ध योग्य पाऊल ठरू शकत नाही. नोटबंदीने शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांचे  कंबरडे मोडले. परिणामी, बॅंकासमोर रांगेत उभ्या राहिलेल्यांमधून अनेक लोकांचा नाहक जीव गेला.
भारताची अर्थव्यवस्था या नोटबंदीमुळे विस्कळीत झाली आहे. अर्थ व्यवस्था सुरळीत झाल्याचा दावा हा फोल असून पुढल्या वर्षी सुद्धा याचे गंभीर परिणार अर्थव्यवस्थेवर पडतील.यामुळे देशाचा विकास प्रभावीत होण्याची दाट शक्यता आहे.
महाविद्यालयामध्ये मायक्रोइकोनॉमिक्स डेवलपमेंट इन इंडियाः पॉलिसी परस्पेक्टिव्स चे उद्घाटन करताना ते म्हणाले की गेल्या काही दशकात जलद आर्थिक विकास आणि उत्पन्न यातील नफ्यामुळे व्यक्तिगत आणि प्रांतवार समानता आणण्यात मदत झाली. मागास जाती आणि अल्पसंख्यांक आता सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...