सावंतवाडी,दि.18 - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. कोणी कितीही आदळआपट केली, तरी मला मंत्री होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असे विधान राणे यांनी यावेळी बोलताना केले.
दीपक केसरकरांवर हल्ला चढविताना के म्हणाले की,दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला कंलक आहे. हा कंलक आगामी विधानसभा निवडणुकीत पुसणार, असे यावेळी नारायण राणे यांनी म्हटले.
नारायण राणेंना मंत्री करू नका, यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. केसरकर हा चिरपूट आणि खोटारडा आहे. जिल्ह्यात वैद्यकीय व्यवस्था नाही, निधीची घोषणा मात्र प्रत्यक्षात किती निधी आणला ते सांगावे. केसरकरांचे काम दाखवा आणि एक लाख कमवा, अशी घोषणाही यावेळी नारायण राणे यांनी केली.
No comments:
Post a Comment