तिरोडा,दि.२०ः- राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारला गोंदिया जिल्हाच्या दोनतासाच्या दौऱ्यावर आलेले असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या मतदारसंघातील महसुल व बांधकामाशी संबधित मागण्यांचे तसेच गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासंबधीचे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे महसुलमंत्री हे गोंदियात येऊनही त्यांना जिल्ह्यातील महसुलसंबधाचा व जिल्ह्यातील पिक पाण्याचा आढावा न घेणेच पसंत केल्याने त्यांच्या या भूमिकेबद्दल भाजपमध्येच नाराजी व्यक्त केली जात आहे.
आमदार रहागंडाले यांनी दिलेल्या निवेदनात गोंदिया जिल्हा पूर्ण दुष्काळ घोषित करणे,बेरडीपार येथील तलावामध्ये जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना खरेदी विक्री करीता परवानगी देणे अशा अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी संबधित मागण्यांचा समावेश होता.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment