Thursday 23 November 2017

उशीरा येऊनही पालकमंत्र्यानी तब्बल चार तास घेतला जि.प.योजनांचा आढावा

गोंदिया,दि.23ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या विविध विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा तसेच कामांचा आढावा आज गुरुवारला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला.सकाळी 12.30 वाजता होणारी आढावा बैठक तब्बत तीन तास उशीरा 4 वाजता दरम्यान सुरु झाली,ती वृत्तलिहिपर्यंत म्हणजे 9 वाजेपर्यंत सुुरूच होती.या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे,उपाध्यक्ष रचना गहाणे,आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे,समाजकल्याण सभापती देवराज वडगाये,महिलाबालकल्याण सभापती विमल नागपूरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजना व विकासाच्या नियोजनासाठी पहिल्यांदाच सकारात्मक भूमिका घेत बैठक आयोजित केली.त्या बैठकीला सुध्दा ते नियोजित वेळी न येता साडे तीन तास उशीरा आले. सायकांळी 4 वाजता सुरु झालेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करीत आढावा घेत कामांच्या नियोजनाच्या सुचना दिल्या.विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी शासनाकडून व जिल्हा नियोजन विभागाकडून विविध योजनांसाठी दिलेला निधी योग्य कामावर व वेळेच्या आत खर्च होत आहे का जर झाला नसेल तर का झालेला नाही याबाबींचा सखोल आढावा संबधित विभागाकडून घेत आहेत.समाजकल्याण व महिला बालकल्याणच्या विविध योजनांचा पैसा अद्यापही खर्च झालेला नाही.सोबतच बांधकाम विभागाच्या नियोजनावरही त्यांचे बारीक लक्ष आढावा दरम्यान ठेवले होते.बांधकाम विभागातील काही कर्मचारी जे अधिकृत त्या पदासाठी काम करीत नाहीत ते सुध्दा रात्रीपर्यंत पालकमंत्री असल्याने कार्यालयात थांबले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...