Saturday 18 November 2017

प्रगत राष्ट्राच्या निर्मितीसाठी महिलांना संधीची गरज- पी.जी. कटरे


बिरसोला येथे महिला सक्षमी कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया,दि.१८ - प्रगत राष्ट्र निर्मितीसाठी महिलांनी संधी देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती पी.जी. कटरे यांनी गेल्या सोमवारी (दि.१३) केले. बिरसोला येथे आयोजित महिला सक्षमीकरण आणि स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शामकृष्ण पाचे ह्या होत्या. यावेळी डॉ.सविता बेदरकर,योजना कोतवाल,सरपंच फत्तेलाल मातरे,उपसरपंच निरवंती पाचे,डॉ. प्रकाश धोटे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कटरे म्हणाले की,मुलींना जन्म देणारे आई-वडील हे भाग्यवान आहेत. महिलांवरील अत्याचार हे यापुढे थांबले पाहिजे, असेही ते म्हणाले. श्रीमती बेदरकर आपल्या भाषणात म्हणाल्या की,सावित्रीबार्इंचा संघर्ष हा महिलांना खरा न्याय देणारा ठरला.
यावेळी अंगणवाडी आणि शाळेला, लाउडस्पीकर संच,खेळणी,खुच्र्या, रक्तदाब मापक यंत्र आणि स्वच्छता साहित्य श्री. कटरे यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, मुलींना जन्म देणाèया मातांची ओटी भरून त्यांचा सत्कार करण्यात आला. गरोदर माता, स्तनदा माता यांना पोषण आहार देऊन किशोर वयीन मुलींना आरोग्य विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मातरे यांनी केले. संचालन ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी केले. उपस्थितांचे आभार वंदना दाते यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...