Tuesday, 21 November 2017

मुलींनो,शौचालयासाठी वडीलांना आग्रह धरा!


तिरोडा,दि.21: श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने डाकराम सुकडी पावन झाली आहे. तिथक्षेत्राचा दर्जा आपल्या गावाला आहे. गावात यात्रेकरुनही मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, गावात उघड्यावर विष्ठा दिसते. आपल्याच मुली उघड्यावर शौचास जातात. आपल्या गावासाठी हे भूषणावह नाही. त्यामुळे यात आता बदल झाला पाहिजे, असे प्रतिपादन करुन मुलींनी आपल्या वडीलांकडे संडास बनविण्याचा आग्रह धरावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकडी येथे गुरुवारी पहाटे ५ वाजता गुडमार्निग पथकाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर सरपंच जयश्री गभणे, उपसरपंच निलेश बावणथडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुक्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही. राठोड, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेद इमामदार, गोरेगावचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे, तिरोडा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी आर.के. दुबे,  अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सहाायक गटविकास अधिकारी आंदेलवाड, सुकडी ग्रामपंचायत सदस्य जयश्री चंद्रीकापुरे उपस्थित होते.
पहाटे पाच वाजता जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा गावात पोहोचली. दरम्यान गावात कर्मचाèयांनी रस्त्यावर गस्त घातली. उघड्यावर शौचास जाणाèया लोकांवर दंड आकारण्यात येत असल्याचे उघड्यावर शौचास जाणारे व्यक्ती आढळून आले नाही. याप्रसंगी गावात गृहभेटी करण्यात आल्या. ज्या व्यक्तीकडे नादुरुस्त शौचालय आहेत. त्यांच्याकडे गृहभेटी करुन त्यांना शौचालयाचे महत्व पटवून देण्यात आले. त्यामुळे संजय जगन पटले, विनोद मोतीराम उके, विजय भिकराम उईके, ललीता सुभाष धुर्वे, सोमाजी केशवरव रायकर यांनी वैयक्तीक शौचालय तयार करण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याकडे शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करुन बांधकामाला सुरुवात करण्यात आली. गावातील बुरड वस्तीतील अनेक व्यक्ती उघड्याावर शौचास जात असल्याने रस्त्याव प्रचंड घाण आढळून आली. लोकांनी घरात शौचालय तयार करावे. तात्पुरता सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा असे सांगून यापुढे उघड्यावर शौचास बसणाèयावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी दिले.
गृहभेटीनंतर ग्रामपंचायत येथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. ज्या रस्त्यावरुन जाणे कठिण आहे अशा ठिकाणात संडासला कसे बसता, असा सवाल उपस्थित करुन आता उघड्यावर संडासला बसण्याची मानसिकता बदलवा, असे कळकळीचे आवाहन करुन डाकराम सुकडी म्हणजे, स्वचछतेचा उत्तम नमूना राहील. असा संकल्प करण्याचे आवाहन याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.राठोड यांनी केले. तुम्ही स्वच्छ, आरोग्यदायी राहिले पाहिजे. संचालन राजेश मेश्राम यांनी केले. आभार पाणी व गुणवत्ता निरीक्षक व्ही.डी.मेश्राम यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...