Tuesday, 21 November 2017

विवेकानंद ग्रंथालयात ग्रंथालय सप्ताह

भंडारा,दि.21ः- ग्रंथालय सप्ताह निमीत्त श्री विवेकानंद ग्रंथालय जवाहरनगर (भंडारा) येथे झालेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना (दि.20) जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाला नारायण अगस्ती,मुख्याध्यापक श्री.रामटेके,देवेंद्र  सहारे,वसंत चन्ने, ग्रंथपाल ईस्तारी मेंढे,         एच.आर.लांजेवार,प्रल्हाद पिलारे तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होते. वर्ग 6 ते 8 व 9 ते 10 असे दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटात कु.संचीता सुखदेवे,सेजल लांडगे, ओम ढवळे , सम्यक चवरे यांना प्रथम , द्वितीय व तृतिय असे पारितोषिक देण्यात आले.दुसर्या गटात कु.गायञी पिलारे,वैष्णवी बारई,सिमा खडसे, समीक्षा डोरले  यांना पारितोषिक देण्यातआले. कार्यक्रमाचे संचालन वसंत चन्ने यांनी केले. प्रास्ताविक देवेंद्र सहारे यांनी केले तर आभारप्रदर्शन नारायण अगस्ती यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...