Saturday, 18 November 2017

मुरदोलीजवळील पुलावरून ट्रक कोसळला

IMG_20171118_114042

गोंदिया,दि.18ः- गोंदिया-कोहमारा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरदोलीगावाजवळील जांभळी फाट्य़ाजवळून वाहणार्या नाल्यावरील पुलावरुन कठडे तोडत ट्रक खाली कोसळल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणने आहे.कोहमाराकडून गोंदियाकडे येत असलेल्या एका टाटा इंडिका गाडीला वाचविण्यासाठी मुरदोलीकडून कोहमाराकडे जाणार्या त्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला.यामध्ये जिवित हाणीन झाली नसली तरी ट्रकच्या चालकाला मार लागल्याने त्यास उपचारासाठी हलविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...