गाजियाबाद,दि.22 -पती-पत्नीत बनाव झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीला त्रास देण्यासाठी एका पतीराजाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे सासूचा मोबाईल क्रमांक शेअर केला. या अकाऊंटच्या माध्यमातून तो पतीदेव अश्लिल कामेंट्र करून पत्नीला कालरॉगर्स म्हणून उल्लेख केला. परिणामी, सासूबाईंना फोन येऊ लागले.प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्या सासूबाईंनी याबद्दल आपली मुलामुलींना याबद्दल माहिती दिली.
पिडीत महिलेच्या मुलाने फोन करणाऱ्यांना जाब विचारल्यावर त्याला या प्रकाराची माहिती झाली. या प्रकाराची तक्रार पोलिसात करण्यासाठी गेलेल्या पिडीत महिलेला सिहानी गेट पोलिसांनी हुसकावून लावत तिला सायबर सेलकडे जाण्यास सांगितले, असा आरोप त्या महिलेने केला.
मुलीच्या म्हणण्याप्रमाणे तिचा पती हा तिला दररोज हुंड्यासाठी मारहाण करीत होता. दररोजच्या त्रासाला कंटाळून तिने आईकडे आश्रय घेतला होता. त्यामुळे पतिने सदर कृत्य केल्याचे तिचे म्हणणे आहे. या प्नकरणी सिंहानी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी विनोद पांडे यांना विचारले असता आपल्याला काही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितले. पण जर तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला असेल तर ते चुकीचं आहे असंही ते बोलेले आहेत.
No comments:
Post a Comment