Thursday, 23 November 2017

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून एकाची हत्या



गडचिरोली,दि.22ः- पोलिस खबºया असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बंदुकीच्या दांड्याने मारून एकाची हत्या केल्याची घटना काल २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास छत्तीसगड सिमेवरील रायमनोरा जंगलात घडली. नक्षल्यांनी मृतदेहाजवळ पत्रके टाकून रानवाही चकमकीत मृतकाचा हात असल्याचे नमूद केले आहे. दोन दिवसांत दोघांच्या हत्येने धानोरा तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.  जाधव पांडू जांगी (५२) रा. रानवाही असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रानवाही येथील जाधव जांगी हा रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या घरी झोपून होता. दरम्यान गावात २० ते २५ च्या संख्येत नक्षली आले. त्यापैकी चार नक्षल्यांनी जांगी याच्या घरात प्रवेश केला. जाधव जांगी याचे दोन्ही हात धरून व तोंडाला बांधून नक्षल्यांनी बाहेर काढले. त्याची पत्नी रानोबाई हिने नक्षल्यांना विनंती केली. मात्र तिचे काहीही न ऐकता नक्षल्यांनी जांगी याला छत्तीसगड सिमेवर रायमनोरा जंगलात नेऊन बंदुकीच्या दांड्याने मारहाण करून हत्या केली.
जाधव जांगी याचा रानवाही चकमकीमध्ये हात आहे, त्याने पोलिसांना पाच वेळा माहिती दिली, पोलिसाचा खबºया म्हणून काम करणाºयांना अशी शिक्षा दिली जाईल, असे मजूकर लिहिलेली पत्रके चातगाव एरिया कमिटीच्या नक्षल्यांनी जांगी याच्या मृतदेहाजवळ टाकली होती.
काल २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील झाडापापडा येथील कोंबडा बाजारात भरदुपारी सुनील पवार याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दोन दिवसांत दोन नागरिकांच्या हत्या करण्यात आल्याने धानोरा तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...