Saturday 18 November 2017

लवकरच राज्यातील वरिष्ठ प्रशासनात फेरबदल

29-09-2017-1506696518MNAIMAGE85323Mantralaya.jpg

मुंबई,दि.18ः- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जरी रखडलेला असला तरी राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. भाजप-शिवसेना युती सरकारने तीन वर्षांत घेतलेल्या निर्णयांची जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी अहंकार असलेल्या नोकरशहांना बाजूला करण्यात येणार आहे, तर अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात येणार आहे.
भाजप सत्तारूढ झाल्यानंतर राज्याच्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या होत्या. या महत्त्वाच्या खात्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना त्या पदांवर तीन वर्षेही पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांत फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, परंतु काही सनदी अधिकारी सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यास कुचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहंकार राज्याच्या हिताच्या आड येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सरकारला तिसऱ्या वर्षपूर्तीच्या वेळी बोलून दाखविले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...