Thursday 23 November 2017

कर्जापायी शेतक—याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

मूल,दि.23: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.मृतक शेतकरी परशुराम बोलमवारला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी  2008—09 या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला ना​हक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले. मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...