उडुपी,दि.24 - 'अयोध्येतील रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच होईल. दुसरी-तिसरी कुठलीही वास्तू तिथं उभी राहू शकत नाही,' असं ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केलं.
कर्नाटकातील उडुपी येथे सुरू असलेल्या धर्मसंसदेला संबोधित करताना ते बोलत होते. 'अयोध्येत राम मंदिरच उभं राहील आणि तिथं असलेल्या शिळांचा वापर करूनच होईल. लवकरच राम मंदिरावर एक भगवा ध्वज फडकताना दिसेल. तो दिवस फार लांब नाही,' असं भागवत म्हणाले.
येत्या ५ डिसेंबरपासून अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. या मुद्द्यावर तोडगा न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डानं त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अयोध्येत राम मंदिर व लखनऊमध्ये मशिद उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भागवत यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
No comments:
Post a Comment