अमरावती,दि.23-साईनगरस्थित बिहाडी चौकात गुरुवारी दुपारी प्रेमप्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादातून एका तरुणीची चाकुने भोसकून खून करण्यात आला. प्रतीक्षा मुरलीधर मेहेत्रे ( वय 22 ,रा. छाबडा प्लॉट) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.या प्रकरणातील आरोपी राहुल बबन भड (वय 32,रा.मुदलीयारनगर) याने प्रतीक्षाशी लग्न झाल्याचा दावा करीत कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास प्रतिक्षा मेहेत्रे तिची मैत्रीण श्वेता बायस्कर हिच्यासोबत दुचाकीने साईनगरातील ओंकार मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन साईनगर मार्गाने परत येताना बिहाडी चौकात दुचाकीवर आलेला राहूल भड याने प्रतीक्षाचे वाहन थांबविले. दोघांमध्ये चर्चा होऊन वाद उफाळला आणि राहुलने प्रतीक्षावर चाकुने प्राणघातक हल्ला केला. यात प्रतीक्षाच्या मानेत चाकू खुपसला, तर तिच्या छाती व पोटावर गंभीर वार केल्याने भर रस्त्यावर घडलेला हा थरार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हल्ला करून राहुल निघून गेल्यानंतर काही नागरिकांनी प्रतीक्षाला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले.माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी व इर्विन रुग्णालयात धाव घेतली. पंचनामा व चौकशीनंतर आरोपी राहुल भडचा पोलिसांनी शोध सुरू केला. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.आरोपी राहुल भड व मृतक प्रतीक्षा मेहेत्रे यांच्यात चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबध होते. दरम्यानच्या काळात दोघांमध्येही खटके उडाले आणि ताटातूट झाली. हा वाद कौटुंबिक न्यायालयात गेला. राहुल भड याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल करून प्रतीक्षाशी लग्न झाल्याचा दावा केला, तर प्रतीक्षाने हा दावा फेटाळला होता. 4 आॅक्टोबर रोजी प्रतीक्षाने फ्रेजरपुरा पोलिीसांकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये राहुलने बनावट फेसबुक खाते उघडून तिचा फोटो अपलोड केल्याचे म्हटले होते. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल भडविरुद्ध कलम 66(ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी राहुलचा शोध सुरू केल्यानंतर 26 आॅक्टोबर रोजी प्रतीक्षा पुन्हा फे्रजरपुरा पोलिस ठाण्यात गेली आणि कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगत राहुलला अटक करू नका, असे पोलिसांना लेखी लिहून दिले. त्यामुळे पोलिसांनी पुढील कारवाई थांबवली. बुधवारी रात्री 8 वाजता प्रतीक्षा व तिच्या वडिलांनी फ्रेजरपुरा ठाणे गाठले आणि राहुलने वर्धा येथील मामा व वडिलांना धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरूच केली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रतीक्षाचा खून करण्यात आला.
No comments:
Post a Comment