मुंबई,दि.22- नाभिक समाजाविरुद्ध केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर नाभिक समाजाची जाहीररीत्या माफी मागितली आहे. गेल्या 7 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल जे विधान केले त्याचा निषेध समाजाच्या सर्व स्तरांवरून होत आहे.
या प्रकरणी नाभिक समाज बांधवांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट त्यांच्या दालनात घेतली. यावेळी सर्वच जण मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे खुद्द मुख्यमंञ्यांना भेटूनच या गोष्टींचा जाब विचारायचा असं ठरविल्या गेले होते. कदाचित अपमान सुद्धा होईल, पण मागे हटणार नाही, असेही ठरविले होते. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलीच, असंही नाभिक समाजाच्या प्रतिनिधीनं सांगितलं आहे. पण एका व्हिडीओ क्लिपद्वारे मी नाभिक समाजाची माफी मागतो ती क्लिप तुम्ही तुमच्या समाजात व्हायरल करा. हवं तर मीडियाला द्या. अशा प्रकारची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दाखविली. जाहीर सभेत मुख्यमंत्री ५ किंवा ५० हजार लोकांसमोर माफी मागतील, पण या व्हिडीयो क्लिपद्वारे ते लाखो लोकांसमोर माफी मागतील आणि हेच आम्हाला हवं होतं. आमच्या प्रत्येक नाभिक बांधवाच्या खिशात मोबाइलच्या माध्यमातून मुख्यमंञ्यांचा माफीनामा असेल. हा आपल्या सर्व नाभिक बांधवाच्या एकजुटीचा विजय आहे, असं आम्हाला वाटतं.
No comments:
Post a Comment