कोल्हापूर/सोलापूर : दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ आज राज्यभरातील नाभिक समाज रस्त्यावर आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्याने प्रशासनाचे लक्ष वेधले. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ नाभिक समाजामध्ये संतापाचे वातावरण होते. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून एकत्र आलेल्या नाभिक समाजाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.सकाळी साडेदहाच्या सुमारास दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गुरू बिराजदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक व्यवसायाबद्दल चुकीचे वक्तव्य करून तमाम नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एखाद्या जातिव्यवसायाबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे मुख्यमंत्रिपदाला अशोभनीय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.मोर्चात सयाजी झुंजार, भारत माने-तिरपणकर, अनिल संकपाळ, अविनाश यादव, दिलीप टिपुगडे, विवेक सूर्यवंशी, रामचंद्र संकपाळ, सूर्यकांत मांडरेकर, सुनील टिपुगडे, विनोद कदम, संग्राम माटे, दीपक माने, दीपक खराडे, तानाजी जाधव, सुनील चव्हाण, किशोर शिंदे, बाजीराव ताटे, विनोद कदम, प्रसाद झेंडे, बाळासो माने, उदय गवळी, बाळासाहेब साळोखे, आदी सहभागी झाले होते.महाराष्ट्र नाभिक महामंडळ, करवीर नाभिक क्रेडिट सोसायटी, संत सेना विद्यार्थी वसतिगृह, कोल्हापूर जिल्हा सलून दुकानमालक संघ, संत सेना गृहनिर्माण संस्था, संत सेना युवक संघटना, नाभिक वधू-वर सूचक मंडळ, आदी संस्था संघटना यात सहभागी झाल्या होत्या.या आंदोलनाला जिल्हा कॉँग्रेसच्या ओबीसी सेल व कोल्हापूर ओबीसी बारा बलुतेदार संघाने पाठिंबा दिला. या मोर्चात उमेश पोर्लेकर, रणजित पोवार, वसंतराव वाठारकर, दिलीप ओतारी, आदी सहभागी झाले होते.
सोलापूर : नाभिक समाजाबद्दल निंदनीय व अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी १२ नोव्हेंबर रोजी भिमा सहकारी साखर कारखाना पाटस, ता़ दौंड जि़ पुणे येथील कार्यक्रमात नाभिक समाजाबाबत निंदनीय उल्लेख केला होता़ मागील सरकारची कार्यपध्दती सांगण्यासाठी नाभिक समाजातील व्यावसायिक हे जसे गिºहाईक टिकविण्यासाठी प्रत्येकाचे अर्धी दाढी, अर्धी मिशी कट असे अर्धे अर्धे काम करतात तसे मागील सरकारने कार्य केले आहे असे उदाहरण म्हणून सांगितले होते़ पण नाभिक आपण सागत आहेत तसेच कार्य करत असतात हे नाभिक समाजास सिध्द करून दाखवावे अशी मागणी नाभिक समाजाने निवेदनाव्दारे केली आहे़. यावेळी सोलापूर शहर व महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा जाहीर निषेध केला़.यावेळी संतोष धोत्रे, अॅड़ विकास तिºहेकर, गोवर्धन कोडपाक, शरणू हडपद, श्रीनिवास रासकोंडा, सुधीर वड्डेपल्ली आदी नाभिक समाजातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते़
No comments:
Post a Comment