Sunday, 19 November 2017

मुल्लावासींनी साजरी केली इंदिराजींची जन्मशताब्दी


देवरी,दि.19- तालुक्यातील मुल्ला येथे आज रविवारी (दि.19) देशाच्या प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुल्ला येथील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गौपाले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुल्ला ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सदस्य रवींद्रकुमार आंबागडे.,राजकुमार खोटेले, नेतराम वघरे, सामाजिक कार्यकर्ते तुलाराम वैद्य, माजी ग्राम पंचायच सदस्य तुकाराम धुर्वे,कैलाश नागोसे, दीपक सोनवाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश भदाडे यांनी केले. यावेळी बोलताना श्री. भदाडे यांनी इंदिराजींच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन केले.  यावेळी बोलताना श्री गौपाले म्हणाले की, इंदिरा गांधी या साक्षात दुर्गा होत्या. त्या कणखर वृत्तीच्या होत्या. त्यांनी देशहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्या दृष्ट्या नेत्या होत्या. त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकत नसल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी नवनियुक्त सदस्य आंबागडे आणि वघरे यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन राजकुमार भेंडारकर यांनी केले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...