Saturday, 18 November 2017

राज्यस्तरीय कबड्डी संघात चिचगडच्या सोनालीचे उत्कृष्ठ प्रदर्शन

FB_IMG_1510999724513

चिचगड,दि.18ः- स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित श्रीराम विद्यालय, चिचगड येथील १० व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनी कु सोनाली हरीचंद सलामेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करीत सर्वाधिक गडी बाद करुन राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळवून देण्यात यशस्वी भूमिका पार पाडल्याबद्दल शाळेच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. दि १३  ते १७/११/२०१७ पर्यंत देवास (मध्यप्रदेश) येथे आयोजित १७ वर्षा खालील राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत सोनालीने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र व हरीयाणा संघादरम्यानच्या अंतिम सामन्यात भाग सहभाग घेतला होता. चिचगडसारख्या अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागात राहत असतांना तिने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर, श्रीराम विद्यालय प्राचार्य जनार्धन कोल्हारे, पर्यवेक्षक भैसारे, वीरेंद्र अंजनकर, जितेंद्र रहांगडाले,  गीरी, अतिश ढाले, कोच धानगाये तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

3 comments:

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...