मुंबई,09 : देशातील ३७८ टोल नाक्यांवर येणाऱ्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल येथे पत्रपरिषदेत केली.
गडकरी म्हणाले की, एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई-पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. साडेसात लाख वाहनांना आतापर्यंत अशी स्टिकर्स पुरविण्यात आली आहेत. त्यांच्या खरेदीदाराच्या बँक खात्याशी ई-टोल संलग्न असेल. १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. जुन्या वाहनांसाठीदेखील ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment