गोंदिया,दि.09ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित ज्युडो स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीयस्तरासाठी आपले स्थान सुनिश्चित केले आहे.
यात अमर अमिन, आकाश केशरवानी यांची निवड झालेली असून पुढील विभागीयस्तरीय ज्युडो स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करतील.यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व उमा बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. एन.आर. कटकवार यांना दिले. प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, कुलदीप भौतिक, अभय गुरव, विणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, मीनाक्षी महापात्रा, विकास पटले, राहुल रामटेके, दिव्यांशू जायस्वाल, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, तोमेश पारधी, रुपकला रहांगडाले, क्रीडा अध्यापिका ज्योती पहिरे, हेमा नायडू, पंकज खैरे, डॉ. लालचंद पारधी, किरण कांबडी, शेंडे, मेंढे, खुशबू बांगडकर तसेच सर्व अध्यापक वर्गाने विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment