Thursday, 9 November 2017

रामराजे निंबाळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

पुणे,09- राज्याचे माजी शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात संचलित रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचा “प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार” महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. श्री. रामराजे निंबाळकर यांना प्रा.सदानंद मोरे यांच्या हस्ते व शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे प्रदान करण्यात आला. 
पुणे येथील पत्रकार भवनात हा पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळे
 पिंपरी चिंचवडचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबासाहेब तापकीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अभिनव संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.  संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेच्या सचिव सौ मीरा चिकने-देशमुख यांनी मानपत्राचे वाचन  केले. मंदार चिकणे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाची सांगता शरयू जाधव यांच्या पसायदानाने झाली.  संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...