Thursday, 16 November 2017

एअर इंडियाचा अधीक्षक निघाला तस्कर


मुंबई,16- एअर इंडियातील सर्व्हिस इंजिनीअर विभागाचा वरिष्ठ अधीक्षक जनार्दन गुणाजी कोंडविलकर यास ४४.१० लाख रुपयांच्या सोनेतस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोने घेण्यासाठी आलेल्या विजय जगदीश रावळ यालाही अधिकाऱ्यांनी अटक केली.


बँकॉकहून एआय ३३१ हे विमान मुंबईत आले, तेव्हा कोंडविलकर कार्यरत होता. विमानाला जोडलेल्या एअरोब्रिजमधून बाहेर येताना त्याचा संशय आल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली.



त्यावेळी त्याच्याकडे सोन्याची आठ बिस्किटे आढळली. त्याची किंमत ४४.१० लाख रुपये होती. त्यानेही या तस्करीची कबुली दिली. त्यानंतर विमानतळाच्या बाहेर हे सोने घेण्यासाठी थांबलेल्या विजय रावळ यासही अटक करण्यात आली. एअर इंडियाच्या वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यास अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकास सोने तस्करीप्रकरणी अटक झाली होती. त्याच्याकडे १५ लाख रुपयांचे सोने सापडले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...