Wednesday, 8 November 2017

ग्रांप निवडणुक २० लाखाचे अपहार प्रकरण नस्तीबध्द,पोलीस विभागाची भूमिका संशयास्पद

गोंदिया,दि.08.-राज्यसरकार कुठल्याही निवडणुका असल्या की त्या निवडणुकीच्या प्रकिया काळातील सर्व व्यवहारासाठी शासकिय निधी उपलब्ध करुन देते.त्यांनुसार जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका सन २०१०-२०१४ करीता खर्च भागविण्यासाठी लेखाशिर्ष २०५३०५४७ ग्रामपंचायत १३ कार्यालयीन खर्चनुसार ३२ लाख एकोणचाळीस हजार नऊशे एक रुपये(३२३९९०१) चा निधी देण्यात आले होते.त्या निधीपैकी सुमारे २० लाख ७० हजार ५५० रुपयाच्या निधीची अफरातफर करुन शासकिय निधीचा अपहार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश दुरुगकर यांनी केला होतो.त्यासंबधी दुरुगकर यांनी तिरोडा पोलीस ठाणे येथे ११ जुर्ले २०१७ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीवर कुठलीही कारवाई ३१ आक्नटोंबर पर्यंत करण्यात आले नव्हते, मात्र १ नोव्हेंबरच्या बेरार टाईम्सच्या अंकात सदर बाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तिरोडा तालुक्यात २०१० व २०१२ या वर्षात झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकामध्ये खर्च भागविण्यासाठी देण्यात आलेल्या शासकीय निधीतून २० लाख ७० हजार ५५० रुपयाची अपरातफर झाल्याप्रकरणीचा तक्रारीवर तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप कोळी यांनी १ नोव्हेंबर २०१७ रोजी पत्र पाठवून चौकशी दरम्यान कुठलाही अपहार झाला नसून आपली लेखी तक्रार नस्तीबद्द करण्यात येत असल्याचे पत्र दिल्याने हे प्रकरणच पुर्णत कोमात गेले आहे.तर 7 नोव्हेंबरला जेव्हा कोळी यांना भ्रमणध्वनीवर याप्रकरणाची माहिती विचारण्यात आली असता त्यांनी मी रजेवर आहे,आल्यानंतर माहीती कळवितो असे सांगितले,यावरुन हे प्रकरण निष्पक्षपणे पोलिसांनी कुणाच्या तरी दबावात हाताळलेेले नसावे अशी शंका निर्माण झाली आहे.
त्यातच वृत्तपत्रामध्ये जोपर्यंत हे प्रकरण समोर आले नव्हते तोपर्यंत कुठलीहे पत्र देण्यात न आल्याने याप्रकरणात घोळ असल्याची शंका दुरुगकर यांनी व्यक्त केली असून याप्रकरणात आपण वरिष्ठाकंडे दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयाची सुध्दा अवहेलना केल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...