Monday, 3 October 2016

श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकार्यांचे स्वागत

गोंदिया,दि.03:- भारतातील लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या वृत्तपत्रातील पत्रकारांवर दिवसेदिवंस वाढत असलेल्या हल्यांचा निषेध नोंदवित पत्रकारावर हल्ला करणार्याविरुध्द कारवाईसाठी कडक पत्रकार सरक्षण कायदा तयार करण्यात यावा या मागणिचे निवेदन आज ३ आॅक्टोंबरला गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.त्या आधी नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पुष्पगूच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...