Monday, 3 October 2016

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला

गोंदिया/रावणवाडी (ता.३)– गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे जिल्हावासीयांच्या नाकी नऊ आले आहेत. असे असताना आता चोरट्यांनी बँकांनाही टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार वर्षापूर्वी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथील एका बँकेत दरोडा पडला होता. मात्र, त्या दरोडा प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यात गोंदिया पोलिसांना अद्यापही यश आले नाही. असे असताना रावणवाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोड्याची पुनरावृत्ती झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...