Sunday, 31 December 2017

संविधान बदलाचे वारे, सावध होण्याचा इशारा

नागपूर,दि.30 : देशात संविधान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गाफिल राहू नये, सावध व्हा, असा इशारा ठाणे येथे भरलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी येथे दिला.आंबेडकरी-दलित साहित्यात पारंपरिक लेखनच होत आहे. यातून आता बाहेर पडण्याची गरज आहे. दलितांनी आदिवासींवर, आदिवासींनी दलितांवर लिहिण्याची गरज आहे. जागतिकीकरणामुळे मोठे परिणाम होत आहे त्यावरही लिखाण होण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही कांबळे यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, डॉ. आंबेडकर कॉलेजी दीक्षाभूमी आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीतील दादासाहेब कुंभारे सभागृहात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ‘प्रा. वामन निंबाळकर व डॉ. ज्योती लांजेवार वाङ्मय लेखन व सामाजिक-सांस्कृतिक कर्तृत्व’ या विषयावर आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी होते. विचारवंत व समीक्षक डॉ. वि.स.जोग हे प्रमुख अतिथी होते. डॉ. आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार आणि पी.डब्ल्यू.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार यांच्या कवितांवर प्रकाश टाकला. या दोन्ही व्यक्ती चळवळीतून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लेखणीला धार होती, असेही ते म्हणाले.वि.स. जोग यांनी वामन निंबाळकर आणि ज्योती लांजेवार या आंबेडकरी-दलित कवितेतील वाघ असल्याचे स्पष्ट केले.प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांनी भूमिका विषद केली. प्रा. रवींद्र तिरपुडे यांनी संचालन केले. प्रा. अमृता डोर्लीकर यांनी आभार मानले.यावेळी पार पडलेल्या चर्चासत्रात डॉ. अजय देशपांडे, अशोक थूल, डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. निशा शेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. विकास सिडाम, डॉ. देवानंद खोब्रागडे, डॉ. मनिषा नागपुरे आणि डॉ. जलदा ढोके यांचा सहभाग होता.

मच्छिमार समाजाच्या समस्या सोडविणार – महादेव जानकर

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.30 – मच्छिमार बांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प उभारत असताना मासेमारीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी राज्य शासन काळजी घेईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाशी निगडीत मच्छिमारांच्या समस्यांबाबत स्थापन झालेल्या समन्वय समितीची बैठक मंत्री जानकर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प उभारताना मच्छिमारांच्या रोजगाराच्या समस्या, स्मारका शेजारच्या समुद्रात मासेमारी करणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. समन्वय समितीची व्याप्ती ठरविणे व समितीमध्ये मच्छिमार सोसायट्यांच्या दोन सदस्यांचा तसेच प्रकल्पाशी संबंधित विभागांचा समावेश करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जानकर म्हणाले की, मच्छिमार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची नेहमीच सकारात्मक भूमिका आहे. शिवस्मारकामुळे कोणत्याही मच्छिमार बांधवांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही. या प्रकल्पामुळे मस्त्यव्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामासंदर्भात सेंट्रल फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत तसेच मच्छिमार सोसायट्यांमार्फत स्वतंत्र अहवाल मागविण्यात यावेत. मच्छिमार समाजातील तरुणांना रोजगार उपलब्धतेसाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मच्छिमार सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी तसेच मच्छिमार बोटींच्या माहितीसाठी आधार क्रमांकाशी जोडण्याचा विचार सुरू असल्याचेही जानकर यांनी यावेळी  सांगितले. यावेळी मच्छिमार सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. त्यावेळी मच्छिमार समाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मस्त्य व्यवसाय आयुक्त बोरके, सह आयुक्त रा. ज. जाधव, उपसचिव र. व. गुरव, समितीचे सदस्य व मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलेसो, रमेश पाटील, मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कृष्णकुमार मेहेर, परशुमार मेहेर, लक्ष्मण धनूर, जयेश भोईर, आदी यावेळी उपस्थित होते.

भांडारबोडी येथे टँकरने बालकास चिरडले

नागपूर,दि.30 : वेगात जाणाऱ्या टँकरने रोड ओलांडणाऱ्या १० वर्षीय बालकास धडक देत चिरडले. शिवाय, ताबा सुटल्याने टँकर रोडच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रोडच्या मध्यभागी टायर जाळून रोष व्यक्त केला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक – तुमसर (जिल्हा भंडारा) मार्गावरील भांडारबोडी येथील बसथांब्याजवळ शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
राजेश नंदकिशोर तरारे (१०, रा. भांडारबोडी, ता. रामटेक) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. राजेश हा भांडारबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकायचा. त्याचे आई – वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तो शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे बसथांबा परिसरात मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो रोड ओलांडत असतानाच तुमसरहून रामटेकच्या दिशेने वेगात येत असलेल्या एमएच-२९/एम-८५१ क्रमांकाच्या टँकरने त्याला उडविले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर, नागरिक येत असल्याचे पाहताच चालकाने वेग वाढवून टँकरसह पळ काढला. या धावपळीत त्याचा ताबा सुटला आणि टँकर परिसरातील राखी तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या रोडच्या कडेला उलटला. त्याच चालकाने टँकर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.

११४ शहिदांच्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी एक व्हा-ना.बडोले

गोंदिया,दि.30 : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय छळ केला जात आहे. आपल्या हक्कासाठी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. ११४ शहिदांच्या रक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी मतभेद विसरून एक व्हा. आपला सर्वांचा विजय हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
खिल्या-मुठ्या येथे गोवारी बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष, नगरसेवक व पालकमंत्री यांनी खिल्या-मुठ्या देवस्थानाकरिता जागा देण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष माधव चचाणे होते. दीप प्रज्ज्वलन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुणे म्हणून म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, न.प. बांधकाम सभापती घनशाम पानतावणे, अमृत इंगळे, नगरसेवक सचिन शेंडे, गुलाब नेवारे, का.ज. गजबे, डी.टी. चौधरी, गोविंद शेंडे, नरेश चौधरी, विनायक शर्मा, शेखर कोहळे, सुशील राऊत, मधू नेवारे, शीला नेवारे उपस्थित हते.
संचालन सी.ए. आंबेडारे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश नेवारे, मोतीराम नेवारे, राधेशाम कोहळे, पवन काळसर्पे, मोहन शहारे, श्याम शेंदरे, सी.बी. कावरे, संजू राऊत, शामबाबू चामलाटे, रतिराम राऊत, राजेश नेवारे, राजेश वघारे, खेमचंद राऊत, अनिल शेंदरे यांनी सहकार्य केले.

हळदी-कुंकूच्या माध्यमातून मिळणार ‘स्वच्छतामय’ संक्रातीचा संदेश

१५ ते ३० जानेवारीपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन
१ व ३ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

गोंदिया,दि.३० : महाराष्ट्रात संक्रांतीनंतर महिलांमध्ये वाण वाटून आपले नातेसंबंध दृढ करण्याची प्रथा आहे. याच बाबीला हेरून जिल्हा परिषद गोंदियातर्पेâ ‘स्वच्छतामय संक्रांतीचे हळदी-कुंकू’ हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्व गावांमधील महिलांची नाळ स्वच्छतेशी जोडण्याचे कार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रशिक्षणाच्या माध्यमातून झाली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी १ जानेवारी रोजी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त अभियानासाठी विशेष ग्रामसभा तर ३ जानेवारी रोजी महिलांची ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतीत आयोजित करण्यात आली आहे. तर १५ ते ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १७९७ अंगणवाडी केंद्रांत कमाल १०० महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आज (दि.३०) जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे व सीईओ रवींद्र ठाकरे,संपुर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड,महिला बालकल्याण विभागाचे उपमुकाअ पारखे यांनी दिली.
गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त झाला असून गोंदिया जिल्ह्याची वाटचाल आता ‘ओडीएफ प्लस’कडे होत आहे. त्यानुसार महिलांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेकडे पोहोचण्याचे धोरण शासनाने तयार केले आहे. तसेच पॉलीथीनमुक्तीच्या दिशेने ग्रामीण भागात वाटचाल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, शौचाहून आल्यानंतर तसेच बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, त्याची सवय लावून घेणे, महिला, मुलींसाठी ग्रामपंचायतस्तरावर स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध व्हावी, यासाठी व्हेडींग मशीनची व्यवस्था करणे,मासिक पाळीमध्ये उपयोगात येणार्या सॅनिटरी नॅपकिनचा वापर व त्याचे व्यवस्थापन,बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन,पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण व हाताळणी ,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,प्लस्टिक थैली,ग्लासेस,कप,प्लेटस आदींच्या वापरापासून परावृत्त करुन ग्रामपंचायती पाॅलिथिन मुक्त करणे,शौचालयांचा वापरावर भर देणे,गरोदर माता व किशोरवयीन मुलींना आवश्यक पोषण आहाराबाबत,जनजागृत करणे,महिला बचतगटांचे सक्षमीकरण ,स्थानिक उपलब्ध भाजीपाला व झांडाचे आहारात महत्व आदी बाबींचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे.या उपक्रमातंर्गत 1 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा व 3 जानेवारी रोजी महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर 4 ते 6 जानेवारी दरम्यान ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक वार्डात सभेचे आयोजन करावयाचे आहे.4 ते 12 जानेवारी दरम्यान अगणवाडी पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका,आशा सेविका व उमेद अभियानाच्या समुदाय संशाधन व्यक्तीचे उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.महिला या ग्रामीण विकासाचा कणा व निर्णय प्रकियेतील महत्वाच्या घटक आहेत.स्वच्छतेच्या बाबतीत महिलांनापर्यंत सुयोग्य माहिती पोचविल्यास त्याचा गावातील संपुर्ण स्वच्छतेबाबत विधायक परिणाम होणार असल्याची आशा असल्याने स्वच्छतामय संक्रातीचे हळदीकूंकू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील दीड लाख ग्रामीण महिलांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोचवा असा या उपक्रमांचा उद्देश आहे.उपक्रमासाठी 3655 कर्मचार्यांच्या समावेश,जिल्ह्यातील 58 अंगंणवाडी पर्यवेक्षिका,1535 सेविका,1483 अंगणवाडी मदतनिस तर 157 मिनि अगणवाडी सेविका असे 3277 कर्मचारी या उपक्रमासाठी कार्य करणार आहेत.उमेद अंतर्गत गाव स्तरावर 329 समुदाय संशाधन व्यक्ती,आयसीआरपी,तालुका स्तरावर 24 ब्लाक मिशन मॅनेजर आणि 15 समुह समन्वयक आहेत.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गटसाधन केंद्रातील 24 कर्मचारी आणि जिल्हास्तरावर 14 सल्लागार,16 नेहरु युवा केंद्राचे युवक केंद्राचे समन्वयक असे 3655 कर्मचार्यांचा समावेश या उपक्रमांतर्गत राहणार आहे.

Saturday, 30 December 2017

सिव्हिल लाईन बोडी सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.29 : गोंदियाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सत्तेत आलो. हा संकल्प आम्ही विसरलो नाही. त्याकरिता कटिबद्ध आहोत.काही लोकांनी आम्हाला विकास करण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला न्यायालयीन प्रकरणात गोवले. 9 महिने त्यात गेले. आम्ही आता पूर्ण ताकदीनिशी शहराच्या विकासाकरिता मैदानात उतरलो आहोत. वर्षभराच्या आत शहर बदललेला असेल. आम्ही शहराचा चेहरामोहरा बद्दलविण्यासाठी कृत संकल्प आहोत, त्याकरिता नागरिकांचे सहकार्य आणि विश्वास हवे असे मत नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केले.
नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सिव्हील लाईन बोडीच्या सौदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी, शिक्षण सभापती भावना कदम, नियोजन सभापती मैथुला बिसेन, महिला व बालकल्याण सभापती अनिता मेश्राम, नगरसेवक अफसाना मुजीब पठाण, माजी नगरसेवक सुनीता हेमने, राहुल यादव, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, कंत्राटदार श्याम चंदनकर, बांधकाम विभागाचे अधिकारी बाराईकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत पटले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नगर पालिकेच्या निवडणुकीत रस्ते, सौंदर्यीकरण, नाली, शुद्ध पाणी, भूमिगत गटार योजना आदींची कामे करण्याचे आश्वासन दिले होते. पालिकेने कामांचे नियोजन करावे. आमच्यावर मतदारांनी विश्वास दाखवून निवडून दिले. मात्र आम्ही संकल्प पूर्तीसाठी निधी खेचून आणू, नागरिकांच्या मनातील गोंदिया घडविण्याचा आमचा संकल्प आहे, असे पटले म्हणाले.सभापती दिलीप गोपलानी म्हणाले, शहरात 3 नवीन बगीचे, शहरात 3000 led स्ट्रीट लाईट, रस्ते तयार होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात 60 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक दीपक कदम,संचालन चंद्रभान तरोने यांनी तर आभार पालिकेच्या सभापती भावना कदम यांनी मानले.यशस्वितेकरिता अजय इंगळे, सतीश चौहान, बबन येटरे, नवरत्न अग्रवाल, मंजले यादव, संजय इंगळे, पुनजी लिलहारे, हासानंद गोपलानी, मनोहर ठाकूर, सुनील तिवारी, पप्पू अरोरा, शैलेंद्र मिश्रा, पंडित नरेंद्र शुक्ल, रमण मिश्रा, मनोज मेंढे, मोती कुरील, किशोर व्यास, प्रल्हाद विश्वकर्मा, पिंकी तिवारी, योगेश गिरीया, कार्तिक यादव, भरत कानोजिया, सुमित तिवारी, राम पुरोहित आदींनी सहकार्य केले.

दहा लाखाची लाच घेताना वाल्मिच्या महासंचालकासह दोघे अटकेत


औरंगाबाद,दि.29: तक्रारदार प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे त्यांना परत देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना कांचनवाडी येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या(वाल्मी)  महासंचालक आाणि सहसंचालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. हा सापळा आज दुपारी वाल्मीमध्ये यशस्वी करण्यात आला.
वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ कांचन गोसावी आणि अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र बाबुराव क्षीरसागर(५५)अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना एसीबीचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी म्हणाले की, तक्रारदार हे  वाल्मी संस्थेत प्राध्यापक आहेत.  वाल्मीचे महासंचालक आणि सहसंचालक असलेल्या दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांना सांगितले की,तुमची नेमणुक चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. नेमणुकीच्या वेळी दिलेली शैक्षणिक आणि अनुभवप्रमाणपत्रांची पडताळणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याबाबत त्यांनी विविध नोटीसा आणि स्मरणपत्रे तक्रारदार यांना दिली.
 काही दिवसापूर्वी  आरोपींनी त्यांना हे प्रकरण पुढे नेण्याचे थांबवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील,अन्यथा तुम्हाला ज्या संस्थेत कायम केले आहे, ते रद्द करून  निलंबीत करू, असे धमकावले. काही दिवसापूर्वी तक्रारदार यांनी आरोपी क्षीरसागरची भेट घेतली असता दहा लाख रुपये दिले तरच यातून मार्ग निघू शकेल असे म्हणाले. नंतर तक्रारदाराने महासंचालक गोसावीची भेटून पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला देऊ शकेल, यापेक्षा अधिक रक्कम देणे मला जमणार नसल्याचे सांगितल्यानंतरही दहा लाख रुपये द्यावेच लागतील असा दम गोसावीने त्यांना दिला. आरोपींना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी २१ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याविषयी तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी लाचेच्या मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत महासंचालक गोसावी आणि सहसंचालक क्षीरसागर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे १० लाखाची लाचेची मागणी केली. आरोपींच्या मागणीनुसार आज वाल्मी येथे पोलिसांनी सापळा रचला.यावेळी गोसावी याने क्षीरसागर यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडून लाचेचे दहा लाख रुपये घेतले. ही रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

सीईओ ठाकरें अति.आयुक्त म्हणून तर दयानिधी होणार गोंदिया जि.प.चे सीईओ

गोंदिया,दि29ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांची नागपूर विभागीय अतिरिक्त आयुक्त या पदावर आज बदली झाली आहे.
त्यांच्या जागेवर चंद्रपूर जिल्ह्यातील राजूराचे अति.जिल्हाधिकारी तसेेच प्रकल्प अधिकारी मंतादा राजा दयानिधी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गोंदिया जि.प.मध्ये अभिषेक कृष्णा यांच्यानंतर दयानिधी हे सरळ आयएएस सेवेतील अधिकारी चार ते पाच वर्षाच्या काळानंतर रुजू होणारे अधिकारी ठरले.विद्यमान सीईओ रविंद्र ठाकरे यांनी आपल्या अल्पकालावधीत गोंदिया जिल्ह्यातील अनके गावामध्ये गुडमार्निगं पथकाच्या माध्यमातून जिल्हा हागंणदारी मुक्त करण्यात विशेष योगदान दिले आहे.ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचार्यांनाही कार्यालयीन शिस्तीसोबतच वागणुकीचे धडे शिकवले आहे.सर्वसामान्यांना आपलेसे करणारे आणि सर्वांशी हसतमुख स्वभावाने वागणारे अधिकारी म्हणून ठाकरे यांची ओळख गोंदिया जिल्ह्यात झाली होती.त्यांची बदली नागपूरलाच विभागीय आयुक्त कार्यालयात रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर झाल्याने त्यांचा गोंदियाशी मात्र त्यांची नाळ जुडलेली राहणार आहे.

बेरार टाईम्सचा दणका;रस्ता बांधकामप्रकरणी चौकशी समिती भाजप पदाधिकार्यांच्या स्थायी समिती बैठकीवर बहिष्कार



गोंदिया,दि.२९. -गोंदिया जिल्हा परिषद बांधकाम विभागांतंर्गत येत असलेल्या गोंदिया उपविभागातंर्गत ‘काम न करता ठेकेदाराने उचलले ३ लाख,अभियंत्याचा सहभाग’ या मथळ्याखाली बेरार टाईम्स पोर्टलने आज प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत विरोधी पक्षाचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.आणि बेरार टाईम्स न्युजपोर्टलने प्रकाशित केलेल्या वृत्ताची माहिती देत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
त्यावर सभागृहात उपस्थित जि.प.अध्यक्ष उषा मेंढे व सीईओ रविंद्र ठाकरे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देत चौकशी समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले. गोंदिया जि.प.बांधकाम उपविभागातर्गंत गोंदियाच्या उपअभियंत्याने ठेकेदाराला हाताशी धरुन चक्क रस्ताच खाऊन टाकला नव्हे तर त्या रस्ता बांधकामाचे २ लाख ९६ हजार ११६ रुपयाचा बिल काम न करताच उचलल्याचे प्रकरण बेरार टाईम्सने उघडकीस आणले त्यामध्ये जि.प.बांधकाम उपविभागातंर्गत फुलचूर ते छोटा गोंदिया या रस्ता बांधकामासाठी २२ मे २०१७ रोजी २ लाख ९६ हजार ८८६ रुपयाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.त्यासाठी बाळकृष्ण मजूर सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आले होते.परंतु या रस्त्यावर एकही ट्रिप मुरूम व गिट्टी न घालता काम करण्यात आल्याचे दाखवून बिल काढल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.या प्रकरणाची सीईओ ठाकरे यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले.तर दुसरीकडे बांधकाम विभागाच्या 3054 व 5054 हेडअंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या कामांच्या यादीमध्ये पारदर्शकता नसून जि.प.अध्यक्षांनी मनमर्जीने यादी तयार केल्याचा आक्षेप घेत बांधकाम विभागाच्या सभापती व जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या नेतृत्वात भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला.तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र जि.प.अध्यक्षांनी सादर केलेल्या यादीला समर्थन देत यादी मंजूर करवून घेतली.बैठकीला काँग्रसचे सर्व सभापती,जि.प.सदस्य रमेश अंबुले,राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,राजलक्ष्मी तुरकर,गणेश हर्षे आदी उपस्थित होते.

गरीब विकलांगको दोस्त मिलकर कि व्हीलचेअर प्रदान


 देवरी 29: (तालुका प्रतिनिधी)-नानाविविध उपक्रमोके लिये आये दिन देवरी चर्चा में है। आज और एक सामाजिक काम देवरी के लक्की एवम दिलीप कुंभरे इनके प्रयास से "श्री चमरू जी भोगारे "धानोरी (खामकुर्रा) इनको देवरी के रितेश सुरेश अग्रवाल पार्षद.रतनदीप (काक्के),भाटिया गेजी भाटिया, मनीष बगड़िया, राजू शाहू,कैप्टन भाटिया,इन लोगो ने धनराशि जमा करके व्हील चेयर देने में मदद की। इस काम की चर्चा देवरी शहर मे हो रही है।

Friday, 29 December 2017

ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

गोंदिया,दि.28 : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविल्याच्या माहितीला गोंदिया जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. तत्काळ कामांसाठी आदेश सोडतात, त्यामुळे कायदे, नियम मोडीत काढले जात आहेत. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हृदयरोग, रक्तदाबाच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांना आधीच अतिरिक्त कामांचा ताण आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्याचवेळी इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही ठरले. त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रधान सचिवांसह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविले आहे.
सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडण्यासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वत:च्या स्मार्ट फोनवर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये एसबीएम फोटो अपलोड करणे, पीक कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग कामाचा समावेश आहे. ग्रुप सोडण्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

नूतन विद्यालय वार्षिक स्नेहसम्मेलन एवं क्रीड़ा महोत्सव का शुभारंभ


गोंदियाः- श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित नूतन विद्यालय, श्री कमलाकरराव केशवराव इंगले ज्यूनियर काॅलेज, नूतन इंग्लिश स्कूल, गोंदिया एवं श्री छत्रपति शिवाजीराजे पब्लिक स्कूल, गोंदिया के संयुक्त तत्वावधान में वार्षिक स्नेह सम्मेलन एवं क्रीड़ा महोत्सव का उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरण में किया गया।
इस अवसर पर उद्घाटक के रूप में जिले के पालकमंत्री एवं राज्य के सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले उपस्थित थे। कार्यक्रम की अध्यक्षता नगर परिषद, गोंदिया के अध्यक्ष अशोक इंगले ने की। प्रमुख अतिथि के रूप में पुलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबल पाटील, श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था के उपाध्यक्ष अजय कमलाकरराव इंगले, सचिव अमृत कमलाकर इंगले, डाॅ. शशांक डोये, डाॅ.हरीश श्रोते,कल्पनाताई इंगले, एड. सी. के. बढ़े,मनोज मेंढे, मुख्याध्यापिका भा. द. मार्कण्डेय, कु. ज्योति बिसेन,आश्विनी केंद्रे, प्रभारी, ज्यु.काॅलेज,वाय. पी. बोरकर पर्यवेक्षक,जी. आर. कापगते,मुकेश कुंभलवार स्नेह सम्मेलन प्रभारी उपस्थित थे।
उद्घाटक राजकुमार बडोले द्वारा मशाल प्रज्वलित कर क्रीड़ा महोत्सव का शुभारंभ किया गया। शालेय छात्राओं द्वारा सरस्वती वंदना एवं स्वागत गीत प्रस्तुत किया गया।
इस अवसर पर शालेय छात्र-छात्राओं द्वारा विभिन्न कार्यक्रम प्रस्तुत किये गये, जिसमें सिंपल पीटी विथ प्राॅप्स एंड बाॅल, रिंग ड्रील, मिक्स इवेंट्स स्टाइल, म्युजिकल विंग्स, एरोबिक्स, योगा स्टंट, फ्री स्टाइल रोप इवेंट्स, पिरामिड, लेझीम, रीमिक्स सांग विथ पाॅम-पाॅम, डांस विथ फीदर्स, जासमिन फलाॅवर विथ फॅन, सड़क सुरक्षा संकेत (आरएसपी), स्कूल चले हम थीम, क्वेश्चन मार्क, ड्रील, आदिवासी नृत्य का उत्कृष्ट प्रदर्शन किया गया।
नूतन इंग्लिश स्कूल के महाराष्ट्रीयन ढोल-ताशा पथक द्वारा शिवराय थीम: इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है गीत पर ढोल-ताशे की धुन पर जोरदार प्रस्तुति प्रेक्षकों में सराहनीय रही।

जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ जोमात;५१० क्विंटल सेंद्रीय तांदूळ उपलब्ध

ग्राहकांनी केली ३३१३ क्विंटल धानाची मागणी

गोंदिया,दि.२९ : धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे धान आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था देखील बहुतांशी धानावरच अवलंबून आहे. आधुनिकतेच्या या जगात आज प्रत्येकाला घाई झालेली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करुन धान व अन्य पिके शेतीतून घेण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषयुक्त अन्न खाण्यात येते. त्याचे दुष्परिणाम देखील माणसाच्या शरीरावर होवू लागले आहे. विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या आहारात असले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळत आहे.
परंपरागत कृषि विकास योजना सन २०१६-१७ या वर्षात कृषि आयुक्तालयाने जिल्ह्यात २० सेंद्रीय शेती गटास मंजूरी प्रदान केली. जिल्हा नियोजन समितीने देखील यात पुढाकार घेवून ३१ सेंद्रीय शेती गटास मंजूरी दिली. जिल्हा हा जैवविविधतेने समृध्द असल्यामुळे आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असल्यामुळे अनेक स्थलांतरीत व विदेशी पक्षी या तलावांवर आपली उपजिविका करतात. यामध्ये राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या सुंदर अशा सारस पक्षांचा देखील समावेश आहे. सारस पक्षाचे संगोपन, सेंद्रीय तांदूळ पिकविणाऱ्याला आर्थिक लाभ आणि लोकांना विषमुक्त तांदूळ पुरविणे असा तिहेरी संगम जिल्हाधिकारी काळे यांनी साधून जिल्ह्यात ५१ गटामार्फत एकूण २३७२ शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहीत केले आहे.
जिल्ह्यातील या २३७२ शेतकऱ्यांकडून जय श्रीराम, एचएमटी, चिन्नोर इत्यादी वाणाचा एकूण ५१० क्विंटल तांदूळ उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय तांदूळाचे महत्व जाणून घेवून त्याची चव चाखता यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांच्या संकल्पनेतून सेंद्रीय तांदूळाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी भात शिजवून खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये २८०० लोकांनी सेंद्रीय तांदूळाच्या भाताची चव चाखली. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी या सेंद्रीय भाताची चव चाखली. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रीय तांदळाचा प्रचार व प्रसार सोबतच त्याबाबत जनजागृती झाल्यामुळे सेंद्रीय तांदळाची ३३१३ क्विंटलची मागणी लेखी स्वरुपात कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या प्रकल्प संचालकाकडे नोंदविण्यात आली.
विषमुक्त तांदूळ जास्तीत जास्त लोकांनी खावा त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील तसेच कर्करोगापासून देखील मुक्त राहण्यास मदत होईल. जिल्ह्यात सारस पक्षांचा अधिवास असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधला. सारसांचे अस्तित्व कायम राहावे व त्यांच्यात वाढ व्हावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करुन विषमुक्त तांदूळ पिकविण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे हे शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळले असून या शेतीतून सेंद्रीय पध्दतीने पिकविलेला धान घेत आहे. त्यामुळे त्यांच्या तांदूळाला जास्त किंमत मिळण्यास मदत होत आहे.

स्वच्छता रॅलीने वेधले तुमसरकरांचे लक्ष

तुमसर,दि.29 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद तुमसरने स्वच्छता सर्व्हेक्षण रॅली काढली. शहरातून निघालेल्या या स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ या स्पर्धेसाठी तुमसर नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता अ‍ॅपही तयार करण्यात आला आहे. भ्रमणध्वनीद्वारे स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तुमसर नगर परिषदेने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या मिशनमध्ये व्हावा याकरिता स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीचे आयोजन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व उपाध्यक्ष कांचन कोडवानी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सदर स्वच्छता रॅलीचा गभने सभागृहातून प्रारंभ करण्यात आला. ही स्वच्छता रॅली तुमसर शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीत प्रथम:च सिंधी समाजाचे संत निरंकारी महिला मंडळाने सहभाग नोंदविला होता.
याचबरोबर लॉयन्स क्लब तुमसर, सिंधु युवा समिती, नगरपरिषद नेहरू विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, शारदा विद्यालय, यु.एस.ए. विद्यानिकेतन शाळेसह अन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. तसेच मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक सुनिल पारधी, अमरनाथ रगडे, प्रमोद बरडे, डॉ. गोविंद कोडवानी, ललीत थानथराटे, कल्याणी भुरे, आशिष पडोळे, राजा लांजेवार, मेहताब ठाकूर, वर्षा लांजेवार, शारदा बचत गटाच्या स्वच्छतादुतांनी सहभाग नोंदविला.

स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

देवरी,दि.29 : शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्याकरिता शुक्रवारी (दि.२२) व शनिवारी (दि.२३) रोजी क्यूसीआय समितीने भेट देऊन पाहणी केली.
या वेळी या समितीने देवरी शहरातील ओडीएफ स्पॉट, सार्वजनिक शौचालय व त्यांचा वापर, सोईसुविधा, शहर सौंदर्यीकरण याबाबतीचा आढावा घेतला.या समितीमध्ये पर्यवेक्षक गोविंद चव्हाण व ऋषीराज रॉय यांचा समावेश होता. त्यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश, बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नूभाई शेख, गटनेते संतोष तिवारी, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
क्यूसीआय पथकाने शुक्रवारी (दि.२२) देवरी शहरात आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती चौक मार्केट परिसर, बाजार चौक, पटाची दान, केशोरी तलाव व चिचगड रोड येथील सार्वजनिक शौचालय, बस स्टॅन्ड आणि माँ धुकेश्वरी मंदीर परिसरातील शौचालयविषयक सुविधा व स्वच्छतेसंदर्भात संपूर्ण आढावा घेतला. जीपीएस पध्दतीने जीओटॉग फोटो व आपला अहवाल आॅनलाईन दिल्लीला पाठविला.
याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांना या बाबतीत समितीने विचारले असता त्यांनी सांगितले की, शहर संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहे. प्रत्येक घरी शौचालय असल्याने कोणताही नागरिक उघड्यावर शौचास जात नाही. तसेच बाहेरुन येणाºया लोकांकरिता, व्यापारी वर्गाकरिता शहरात विविध ठिकाणी दहा सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाले आहेत. तेथे पाणी व विजेची सुविधा आहे. त्यामुळे क्यूसीआय पाहणीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊन देवरी शहराला पुन्हा एक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. देवरी नगरी क्यूसीआय समितीच्या पाहणीला समोर जाणारी नागपूर विभागातील नवनिर्मित नगर पंचायतमधील एकमेव पहिली नगर पंचायत आहे, ही बाब देखील विशेष महत्त्वाची आहे. या वेळी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी नगर पंचायतने अतिशय नियोजनपूर्वक आखणी करुन कठोर मेहनत घेतल्याने हे शक्य झाले, असे बोलून दाखविले. यात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी सुरूवातीपासून शौचालय बांधणे व उघड्यावर बसू नये, याकरिता विशेष प्रयत्न केल्याने व नागरिकांनी या अभियानात सहकार्य दिल्याने देवरी शहर संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकले. तसेच या कामात नगर पंचायतच्या कर्मचाºयांना सुद्धा याचे श्रेय दिले आहे.

Thursday, 28 December 2017

देवरी येथे कलार समाजाचे संमेलन येत्या 7 जानेवारीला


सहस्त्रबाहु अथवा सहस्रार्जुन

देवरी,28- श्री सहस्त्रबाहु कलार समाज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने येत्या 7 जानेवारीला रविवारी कलार समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मॉ धुकेश्वरी मंदीर परिसरात आयोजित या कलार समाज संमेलनाचे उद्घाटन रायपूर येथील भारतीय कल्चुरी जायस्वाल समवर्गीय  महासभेचे राष्ट्रीयअध्यक्ष संजयकुमार जायस्वाल यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी नागपूर येथील कलार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर दियेवार हे राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायपूर येथील कोसरे कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष घनशाम मेश्राम उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाग घेऊ इच्छित सदस्यांनी आपल्या नावाची नोंद येत्या 30 तारखेपर्यंत करावयाचे आवाहन करण्यात आले आहे.
या श्री सहस्त्रबाहू संमेलनामध्ये जास्तीत जास्त समाजबांधवांनी भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्राचीन ग्रामीण संस्कृति हमारी धरोहर- विनोद अग्रवाल

गोंदिया। मंडई -मेला, डंडार, तमाशा और शायरी यह हमारे ग्रामीण धरोहर की पुरानी परंपरा है। जिस समय समाज प्रबोधन के साधन नहीं थे तब इसी संस्कृति के माध्यम से हम समाज में नई दिशा का संचार वह प्रबोधन करने का कार्य करते थे। हमारी समाज प्रबोधन की परंपरा व धर्म संस्कृति इसी माध्यम से चली आ रही है और हमने आज भी इसे अपने पूर्वजों के माध्यम से चला कर उसे जिंदा रखा है। उक्त आशय के उदगार भाजपा पूर्व जिलाध्यक्ष विनोद अग्रवाल ने ग्राम गर्रा खुर्द में आयोजित मंडई मेला कार्यक्रम में बतौर उद्घाटक के रूप में व्यक्त कीये।
कार्यक्रम में मुख्य अतिथि के रुप में भाजपा जिला उपाध्यक्ष मुन्ना भारद्वाज, भाजपा जिला महामंत्री भाऊ राव उके, पंचायत समिति सभापती माधुरीताई हरिनखेड़े, कार्यक्रम अध्यक्ष गणेश बरडे, सुभाष मुंदडा, गर्रा सरपंच डीलेश्वरीताई ऐड़े, उपसरपंच सोनाताई जिया लाल बोपचे, रावणवाडी सरपंच सुजीत येवले, जियालाल बोपचे, कामठा उपसरपंच प्रकाश सेवतकर, मेला समिति अध्यक्ष रतिराम ठाकरे, उपाध्यक्ष हिरदीलाल पटले, सचिव छगनलाल न्यायकरे, रविंद्र गावरकर, तमुस अध्यक्ष वसंतराव राहंगडाले, कन्हैयालाल रहांगडाले, यादोराव दिहाडी, जयेंद्र भोयर, गेंदलाल बांगडे, एवं मेश्राम सर आदि मान्यवर, ग्रामीण जन उपस्थित थे।
विनोद अग्रवाल ने आगे कहा कि मंडई -मेला और सांस्कृतिक कार्यक्रम यह एक प्रभावी कला है। नाटक के माध्यम से जो कला का प्रदर्शन, बोध हमें कराया व दिखाया जाता है हम उसे बिना पढ़े ही आत्मसात कर लेते हैं। चाहे वह महाभारत रामायण या अन्य कोई धार्मिक प्रवचन या नाटक क्यों ना हो, हम उसे देख और सुन कर याद कर सकते हैं। आज भाजपा सरकार इन्हीं पुरानी संस्कृति और समाज प्रबोधन के पाठ्यक्रमों को डिजिटलाइजेशन के माध्यम से ऑनलाइन चलचित्र शिक्षा देने पर जोर दे रही है।
      उन्होंने युवाओं को शिक्षा के स्तर पर आगे बढ़ने हेतु प्रोत्साहित किया व सरकार की योजनाओं का लाभ उठाने की अपील की। इसके साथ ही सरकार की योजनाओं, कर्जमाफी, फसल बीमा, गोंदिया को सरकार द्वारा अकाल घोषित किए जाने पर विस्तृत जानकारी प्रदान की। उन्होंने गुमराह करने वालों से सावधान रहने की अपील करते हुए उनके भ्रमित कार्यशैली से ग्रामीणों को अवगत कराया। रावणवाड़ी से गर्रा खुर्द तक बनी सड़क में भ्रष्टाचार होने व हमारे पैसों के दुरुपयोग होने की जानकारी दी। इसके साथ ही ओबीसी समाज को लेकर केंद्र सरकार क्या रुख  अपना रही इस पर सम्पूर्ण जानकारी प्रदान की।

पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नागपूर,दि.28 : अजनीतील एका तरु णाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या (वय १२) घरात शिरून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. दीपक विठ्ठल वाघमारे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली.
रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास आरोपी वाघमारे पीडित बालिकेच्या घरात शिरला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. घरात ती एकटीच असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. त्यामुळे पाण्याचा ग्लास घेऊन आलेल्या बालिकेसोबत आरोपी वाघमारेने लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेली मुलगी गप्प बसली. दोन दिवसांपासून तिच्या वर्तनात फरक पडल्याचे लक्षात आल्याने पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलींच्या पालकांनी तक्र ार नोंदवल्यानंतर अजनी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

डव्वाजवळ चारचाकीच्या धडकेत रानगवा ठार

गोंदिया,दि.28ःः- गोंदिया-कोहमारा राज्यमार्गावरील डव्वा गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर अचानक शेतातून रानगवा आल्याने गोंदियाकडून कोहमाराकडे जात असलेल्या चारचाकी मारुती सेल्युरिओ एमएच 35 पी 6512 या वाहनाची धडक बसली.या धडकेत रानगवा ठार झाला असून वाहन रस्त्याच्या कळेला जाऊन ध़डकली,यात चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

राहुल गांधी म्हणाले, संविधान देशाचा पाया

नवी दिल्ली,दि.28(वृत्तसंस्था) – काँग्रेसचा आज (गुरुवारी) 133वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने राहुल गांधींनी प्रथमच काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. राहुल गांधींनी यावेळी संविधानाविरोधात दिल्या जाणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी टीका केली. ते म्हणाले की, भारताने संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले होते. इतिहासाकडे वळून पाहता, संविधान तयार करणे हा अभिमानाचा क्षण होता. पण आज भाजपचे वरिष्ठ सदस्य याच्या विरोधात बोलत आहेत. भाजप राजकीय फायद्यासाठी खोटे बोलते अशी टिका त्यांनी केली.
भाजपचे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. संविधानातून आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवू शकतो असेही ते म्हणाले होते. हेगडे यांच्या वक्तव्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ जाल्याचेही पाहायला मिळाले होते.या मुद्याला घेऊनच राहुल गांधी म्हणाले की, संविधानाचे संरक्षण ही काँग्रेस पक्षासह सर्व भारतीयांची ही जबाबदारी आहे. देशात आज जे काही घडत आहे ते योग्य नाही. पण आम्ही एकजुट होऊन लढू. संविधान या देशाचा पाया आहे आणि हा पायाच धोक्यात आहे. भाजपचे नेते विविध वक्त्यांनी थेट संविधानावर हल्ला चढवत आहेत.  देशात बनावटपणाचे जाळे पसरवले जात आहे. भाजप या बेसिक आयडियावर काम करते की, राजकीय फायद्यासाठी खोटेपणाचा वापर करता येतो. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. असे होऊ शकते की आपण चांगली कामगिरी करणार नाही. कदाचित आपला पराभवही होईल. पण आपण सत्याची बाजू सोडायची नाही असा सल्ला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

गोंदियानजीक मारोती व्हॅनच्या धडकेत 3 दुचाकीस्वार जागीच ठार

गोंदिया,28- गोंदिया- बालाघाट महामार्गावरील शेंडे पेट्रोलपंपनजिक झालेल्या मारोती व्हॅन आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी सुमारे साडे आठ वाजता (दि.28) घडली.
सविस्तर असे की, बालाघाट कडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या एका सुझुकी मोटार सायकल क्र. एम एच 35 ए.जी 8545 या दुचाकीची मारोती व्हॅन क्र. एम एच 35 एच 0079 धडक बसून भीषण आपघात घडले. सदर व्हॅन ही शेंडे पेट्रोलपंपावरून वाहनात इंधन भरून निघl असताना हा अपघात घडला. उल्लेखनीय म्हणजे या पेट्रोपपंपासमोर एक ट्रक उभा असल्याने सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा समावेश असून त्यात एका महिलेचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. सदर दुचाकीने व्हॅनला जबर धडक दिल्याने व्हॅन चालक सुद्धा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रामनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.वृत्त लिहिपर्यंत मृत आणि जखमींची नावे कळू शकली नाही.

धोबीटोल्यात दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू

गोंदिया,दि.27- आमगाव तालुक्यातील धोबीटोली(सुरकुडा)येथे मंगळवारच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतामध्ये डेव्हीड खिलेश फुंडे (वय 3) व चहल खिलेश फुंडे(9 महिने) यांचा समावेश आहे.फुंडे कुटुबियांच्या माहितीनुसार मंगळवारच्या रात्रीला डेव्हीड व चहलच्या आईने डेव्हीडचे वडील खिलेशला जेवण दिले असता डेव्हीडने सोबतच जेवण केले.त्यानंतर झोपेच्या आधी दुध प्यायला दिला.त्यानंतर काही वेळाने त्यांना बघण्यासाठी गेली असता ते हलचल करत नसल्याने आरडाओरड केली असता आजूबाजूचे सर्व धावून गेले.आणि त्या मुलांना पाहिले असता ते बेशुध्दावस्थेत असल्याचे आढळताच रात्रीलाच ठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तिथून आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पोचेपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे हजर असलेल्या वैद्यकिय अधिकार्यांने सांगितले.आज बुधवारला सकाळी गोंदियाच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे उत्तरीय तपासणी करण्यात आली असून धोबीटोला गावात मात्र शोककळा पसरली आहे.
Facebook

डवकीच्या सिद्धार्थ हायस्कूल येथे वार्षिकोत्सव


देवरी,दि.२८- सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डवकी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या थाटात काल बुधवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले, अंजना खुणे,लखनसिंह कटरे, मिqलद रंगारी, सविता बेदरकर, विद्यालयाचे संस्थापक चैतराम मेश्राम, प्राचार्य महेंद्र मेश्राम, डवकीचे सरपंच उमराव बावणकर, प्रमोद संगीडवार, लक्ष्मण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना ना. बडोले म्हणाले, ‘‘शिक्षण आणि परिश्रमाशिवाय यश मिळणे कठीण आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या आंतरिक गुणाचा विकास होतो.‘‘
आमदार पुराम म्हणाले की, जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर असा असतो. शिक्षणाच्या माध्यमातून त्याचे निर्वाण करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंजना खुणे, श्री बडोले आणि डॉ. डोंगरवार यांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अंजना खुणे यांच्या कवितेचा श्रोत्यांनी आस्वाद घेतला. इतर मान्यवरांनी सुद्धा यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन व्ही. टी. पटले यांनी केले. उपस्थितांचे आभार  जागेश्वर ठवरे यांनी मानले.आयोजनाच्या यशस्वितेसाठी  मुकेश टेंभरे, नरेश निखारे, कार्तिक कोकावार, भूपेंद्र कुलसुंगे, प्रकाश लांजेवार, योगेंद्र बोरकर, हिरालाल खोब्रागडे, राजेंद्र बिसेन आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 27 December 2017

BERARTIMES_27-DEC_2017_02_JAN_2018





महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस


चंद्रपूर,दि.26 : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. त्यामुळे महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घेऊन सर्व प्रकारची गुलामगिरी झुगारावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. भद्रावती येथे तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने पार पडलेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोनालीसा देवगडे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. मंचावर स्वागताध्यक्ष सीमा ढेंगळे, भारीप बमसंचे वर्धा व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, रोहीत वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला, गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, कपूर दुपारे, भामसं जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिलाध्यक्ष लता साव, सुरज गावंडे, सुनील खोब्रागडे, धीरज बांबोळे, सेवचंद्र नागदेवते, कविता गौरकर, अविंता उके, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, लता टिपले, रजनीकुंदा रायपुरे, माया देवगडे, निर्मला शिरसाट, माया महाकुलकर, राजा वेमुला, पद्मा इलन दुल्ला आदी उपस्थित होते. एकदिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेत विविध सत्रांमध्ये महिलांच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आली.

रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला म्हणाल्या, भारताला गुलाम बनवण्यात मनुस्मृतीचा मोठा हात आहे. आपण सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी चालले पाहिजे. मनुस्मृती महिलांना गुलाम बनविते. त्यामुळे तिचे पालन का करायचे? समानता नाकारणाºया  मनुुस्मृतीचे दहन योग्यच असून, मी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.अलीकडच्या काळात सत्ताधा-यांकडून लादली जाणारी नवीन मनुस्मृती अधिक घातक आहे. पुराणमतवादी विचारांची मंडळी घटनाद्रोही राजकारण करीत आहेत. शिवाय, सत्ताधारी वर्ग सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजे, असे  मत  अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त कले.
महिलांच्या राजकीय व सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात  चळवळीच्या अभ्यासक तसेच कार्यकर्तींनी सम्यक मांडणी करून आंदोलनाची गरज व्यक्त केली. रजनीकुंदा रायपुरे, पौर्णिमा पाटील, सीमा ढेंगळे, लता साव, जयदीप खोब्रागडे, कुशल मेश्राम,  आदींनीही मार्गदर्शन केले. लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी ‘जन बदल घालूनी धाव’ हा संगीतमय, तर औरंगाबाद येथील लोकशाहिर मेघानंद जाधव यांनी आंबेडकरी जलसा सादर केला. संचालन राखी रामटेके व प्रास्ताविक लता टिपले यांनी केले. वैशाली चिमूरकर यांनी आभार मानले.

काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच – राजू शेट्टी



नागपूर,दि.26: नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामधील काही नेते नाराजीचा सूर आवळू लागले आहेत. शेतकरी, विदर्भ अशा प्रश्नांवर ठाम भूमिका घेणा-या नेत्यांना एकत्र करीत तिसरी आघाडी उभारण्याचे संकेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिले. यासाठी आपण पुढाकार घेतला तर कुणाला आवडेल, न आवडेल. त्यामुळे कुणी पुढाकार घेतला तर आपण त्यासाठी नक्की मदत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, १५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा दिला. त्यांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजपाही तशीच निघाली. त्यामुळे तिस-या आघाडीसारखे एखादी महाआघाडी उदयास आली तर तिच्या सोबत जाण्याचा विचार केला जाईल. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी विविध पक्षांना सोबत घेऊन रिडालोसची मोट बांधली होती. त्यात आपला सिंहाचा वाटा असे सांगत त्यांनी भविष्यातील बांधणीचे संकेतही दिले.
राज्य सरकारने कापूस व धान उत्पादकांना मदत जाहीर केली. ही मदत फसवी आहे. एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे का, हे राज्य सरकारने आधी सांगावे. विमा कंपन्या न्यायालयात जातील. शिवाय अनेकांनी विमाच काढलेला नाही. त्यामुळे ती मदतही मिळणार नाही. बियाणे कंपन्याही तशी भूमिका घेतील. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकºयांना कुठलीच मदत मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बी.टी.चे वाण विकणाºया बियाणे कंपन्यांना संशोधनाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी घेतात. आता बी.टी. बियाण्यांवर बोंड अळी आल्यामुळे या कंपन्यांचे संशोधन फोल ठरले आहे. त्यामुळे आता शेतकºयांना झालेल्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी या कंपन्यांवर निश्चित करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी केली. शेतकºयांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनाऐवजी आता जुलैचे अधिवेशन नागपुरात घेण्याचा प्रस्ताव पुढे केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारने कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी-काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे



गडचिरोली,दि.२६: सरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरुन सरकारने या घटकांवर कुठाराघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे  प्रवक्ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, श्री.रत्नपारखी, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड उपस्थित होते.
डॉ.राजू वाघमारे यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दलित व आदिवासींवर अन्याय सुरु आहे. आतापर्यंत या घटकांच्या हिताच्या ३५६ योजना बंद करण्यात आल्या असून, बजेटमध्ये ४० टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या ३ महिन्यांत आदिवासी विकास विभागाचे ५०० कोटी व समाजकल्याण विभागाचे ३०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरले. ज्यांच्या ताटात काहीच नाही, त्यांच्याकडूनच हिरावून घेण्याचे हे षडयंत्र आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे, त्यांच्यावर पुस्तके काढायची आणि दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती अडवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असा हा डाव असल्याची टीका डॉ.राजू वाघमारे यांनी केली. सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्या आहेत, विद्यार्थ्यांना भोजनाचे पैसे दिले जात नाही. सरकारी शाळा बंद करुन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा हा प्रकार आहे, असे डॉ.वाघमारे म्हणाले.
कर्जमाफीचे पैसे दिवाळीपूर्वी मिळणार, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत. यावरुन मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. सरकारने खरंच कर्जमाफी दिली असेल तर त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर का केली जात नाही, असा सवाल डॉ.वाघमारे यांनी केला. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. संगणकाशी संबंधित विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. सरकारी पोर्टलच्या माध्यमातून वस्तुंची खरेदी करण्याचा निर्णय झाला असताना मुख्यमंत्र्यांनी आपला विभाग पोर्टलवरुन वगळला. या विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाला. मात्र, सचिवाची बदली करण्यात आली. अधिकाऱ्याची बदली करुन मुख्यमंत्री त्यातून सुटू शकत नाही. या प्रकरणाची सीआयडी व निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही डॉ.राजू वाघमारे यांनी केली.मागासवर्गीय मतदार काँग्रेसपासून दुरावत चालल्याने त्याला जवळ करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक परिवर्तन अभियान सुरु केले आहे. मागासवर्गीय समाज रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, बीएसपी व अन्य पक्षांमध्ये विखुरला आहे. हे सर्व पक्ष भाजपला पराभूत करु शकत नाही. त्यामुळे या समाजाला काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती डॉ.वाघमारे यांनी दिली.

शेतकरी आजही पारतंत्र्यातच -नाना पटोले


अर्जुनी मोरगाव,दि.२६- स्वातंत्र्याला ७१ वर्षलोटून गरीब शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे.इंग्रजाची आणेवारीपध्दत कायम असून देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी शेतकरी नाही.मी अर्जुनी मोरगावातून वनहक्काची लढाई सुरु केली तीच लढाई पुढेही कायम राहणार असून सध्याचे राज्यातील फसवणारे सरकार असून शेतकèयांची कर्जमाफी देखावा असल्याची टिका माजी खासदार नाना पटोले यांनी केली.
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज नाना पटोले अर्जुनी मोरगाव येथे दाखल होताच त्यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आयोजित कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.या कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,चंद्रशेखर ठवरे, माजी जि.प.सभापती धन्नालाल नागरीकर,राजेश नंदागवळी,भागवतपाटील नाकाडे,बँकेचे संचालक प्रमोद लांजेवार,माजी जि.प.सदस्य भरत खंडाईत,सविता ब्राम्हणकर,होमराज कापगते,नानाजी मेश्राम,जगदिश मोहबंशी,नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे,आशा झिलपे,जागेश्वर धनभाते,नितिन पुगलीया,डॉ.विवेक मेंढे,सुभाष राऊत,इंजि.कुमार जांभुळखर,अब्दुल सत्तारभाई रिजवी,प्रज्ञा गणविर,विलास गायकवाड,गजानन नाकतोडे,अनिरुध्द ढोरे यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पटोले म्हणाले की मी स्वतःसाठी नव्हे शेतकरी,शेतमजुर ओबीसीसांठी राजीनामा दिलेला आहे.निवडणुकीत खोटे आश्वासन देऊन भाजप सत्तेची फळे चाखत असून स्वामीनाथन आयोग लागू न करणारी ही सरकार ५६ इंचीची कशी असू शकते अशी टिका करीत देशाच्या सिमेवर जवान शहिद होत असतांना चौकीदारी करणारे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे चहापानाला जातात अशी टिका केली.सोबतच ज्यांना निवडून आणण्याची ताकद आमच्यात असते तेवढीच ताकद त्यांना पराभूत करण्याची आमच्यात आहे हे इतरांनी विसरु नये अशी खोपरकळी सुध्दा त्यांनी मारली.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोठया संख्येने उपस्थित शेतकरी,शेतमजुरामुळे भाजपला qचतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र भाजपचा एकही पदाधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकला नसल्याचे वृत्त आहे.

Saturday, 23 December 2017

आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करा – एकनाथ खडसे


नागपूर दि.23:- राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाला घरचा आहेर दिला. सरकार आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी सरकारने दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. सर्वेक्षण होऊन चार-सहा महिने उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. या काळात लोकांनी मरायचे का? सरकार त्या दृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील करत नाही, असे म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला सुनावले.

देवरी येथे बामसेफचे प्रबोधन शिबीर 7 जानेवारीला

देवरी,दि23 - नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात देवरी येथे बामसेफच्या एक दिवसीय प्रबोधन शिबीराचे आयोजन 7 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
 या शिबीरात नागपूर येथील सत्यशोधन प्रबोधनकार इंजि. अरविंद माळी हे मार्गदर्शन करणार आहेत. वर्तमान काळातील स्थिती आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर इंजि. माळी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक आफताब मंगल कार्यालयात आयोजित या शिबाराचा लाभ नागरिक आणि विद्यार्थी युवकांनी मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लालूप्रसाद यादवांसह 16 दोषी, 6 जणांची निर्दौष मुक्तता


 रांची ,दि.23- बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका खटल्यात रांची सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने आज (शनिवार) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांच्यासह 15 आरोपींना दोषी ठरवले. ती, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने निकाल दिला तेव्हा सर्व 22 आरोपी कोर्टात उपस्थित होते. दोषी ठरवण्यात आलेल्या लालूंसह 17 जणांना कोर्ट 3 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे.
‍कोर्टाने निकाल दिल्यानंतर लालूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी लालूंना कोर्टातून होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आणले आहे. दरम्यान, कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रांची पोलिसांनी बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता.
कोर्टाच्या निर्णयानंतर काही क्षणातच लालू यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवरून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला. “भाजप जनतेमध्ये विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचे अत्यंत वाईट राजकारण करत आहे.’ असा आरोप करण्यात आला आहे.

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची आत्महत्या

चंद्रपूर दि.23: महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाच्या समक्ष कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
वनरक्षक महिलेच्या लैंगिक व मानसिक छळाच्या आरोपावरून चंद्रपूर उत्तरचे महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एन. केंद्रे यांची गुरुवारी चंद्रपूर येथे तडकाफडकी बदली केली. शुक्रवारी दुपारी केंद्रे थेट ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे सहाय्यक व्यवस्थापक डी.एच. चांदेकर यांच्या कक्षात जाऊन बसले. माझी बदली का केली म्हणून चांदेकर यांना विचारणा केली. चांदेकरांनी उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी खिशातून कीटकनाशक काढले आणि प्राशन केले. त्यांना अडवून लगेच ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले होते.वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात केंद्रे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडितेने केला होता.

चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल


रांची(वृत्तसंस्था),दि.23- बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. या घोटाळ्यात आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्र यांसारख्या दिग्गजांच्या नशिबाचा आज फैसला होणार आहे. चारा घोटाळ्यात इतर 22 जणांवरही आरोप आहे. रांचीमधील सीबीआयचं विशेष कोर्ट या प्रकरणी आज निकाल देईल.2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. या घोटाळ्यात भाजपानेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पण, न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण भरवसा असून या प्रकरणात आपल्याला नक्की न्याय मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केस चालविण्याचा राज्यपालांनी दिलेला आदेश रद्द केला.  चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवले आहे.

देवरी चेकपोस्टवर बनावट पावतीचा वापर


देवरी,दि.23: महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. यामुळे सीमा तपासणी नाक्यावर खळबळ उडाली असून बनावटी पावती देणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 चेक पोस्टवर कार्यरत वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी ट्रक क्र. एमएच १२ एलटी ४१७८ चे कागदपत्रे तपासले असता वाहन चालकाकडे नोव्हेंबर २०१७ ची ०७४२६०४ व डिसेंबर २०१७ ची २३३९५२ क्रमाकांची पावती आढळून आली. मोड यांनी दोन्ही पावत्यांची नोंद रजिस्टमध्ये तपासणी केली असता पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही पावत्यांमध्ये एक-एक हजार रुपयाची नोंद असून प्रभारी अधिकारी सीमा तपासणी नाका देवरीचा शिक्का सुद्धा लावलेला आहे.मोड यांनी सदर ट्रक चालकाला पकडून देवरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट सरकारला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या देवरी चेक पोस्टवर दररोज तीन ते चार हजार वाहने ये-जा करतात.
वाहतूक निरीक्षकाद्वारे प्रत्येक वाहनाकडून सी.एफ. शुल्क एक हजार रुपये घेवून त्याची पावती दिली जाते. यातून दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मागील काही दिवसांपासून बनावट पावती देणारी एक टोळी देवरी येथे सक्रीय असल्याची चर्चा होती. यापूर्वी देखील बनावट पावत्या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

Thursday, 21 December 2017

महिला आमदारांची सुरक्षा धोक्यात; विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार


नागपूर,दि.21 : अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.
ज्योती कलानी यांनी सांगितले की, मी आमदार निवासात प्रारंभीच्या इमारतीत खोली क्र. २१४ मध्ये निवासाला आहे. मंगळवारी माझ्यासोबत आमदार विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण निवासाला होत्या. रात्री १२ च्या सुमारास खोलीचा दरवाजा मोठ्याने ठोठावला. दरवाजा उघडला तेव्हा दोन तरुण समोर उभे होते. काही विचारायच्या आतच त्यांनी मला प्रश्न विचारणे सुरू केले तेव्हा विद्या चव्हाण यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितले. पुन्हा पहाटे ५ वाजता कुणीतरी दरवाजा मोठ्यामोठ्याने ठोठावला. त्यावेळी दरवाजा उघडला नाही. पहाटे ५ नंतर आम्हा तिघींना झोप आली नाही. या घटनेची तक्रार आमदार निवासाच्या सुरक्षा रक्षकाकडे केली. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सुरक्षेचा प्रश्न गुरुवारी सभागृहात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते आम्हाला शक्य झाले नाही. या प्रकरणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार आहोत.

उन्हाळी पिकासाठी प्रकल्पाचे पाणी द्या-माजी आमदार दिलीप बन्सोड


गोंदिया,दि.21: यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही भरपाई उन्हाळी पीक घेवून भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र प्रशासनाने उन्हाळी पीक न घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केली आहे.
यंदा कमी पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पिक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी देण्याची मागणी शेतकºयांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, सालेबर्डी, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मिटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहुन जाणारे १ लाख १० हजार घनमिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आत्तापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य असल्याचे बन्सोंड यांनी सांगितले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. शेतकऱ्यांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल. वीज प्रकल्पाला दिले जाणारे पाणी जानेवारी २०१८ पासूनच देणे बंद केल्यास उन्हाळी पिकांना पाणी देणे शक्य असल्याचे बन्सोड यांनी सांगितले.

रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना – दिवाकर रावते


नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) :दि.21-:– रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेमार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्यात मागील काही वर्षात व्यापक प्रयत्न करण्यात आले असून त्याचे फलस्वरुप म्हणून रस्ते अपघाती मृत्यूंचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
मंत्री रावते म्हणाले की, अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे आहे. हेल्मेट न वापरल्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अपघात रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच प्रत्येकामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. दंड वसुली करणे हे आपले उद्दिष्ट नसून रस्ते अपघात रोखण्यासाठी लोकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यात यावी, त्यासाठी व्यापक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात हायवे, पुणे – मुंबई मेगा हायवे आदी महामार्गांवर रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात रोखण्यासाठी रस्त्याची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेपासूनच उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. त्यादृष्टीने समृद्धी महामार्गाचे निर्मिती काम सुरु होण्यापुर्वीच त्यात रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांचा समावेश करावा. निविदा प्रसिद्ध करतानाच त्यात रस्ते सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना मंत्री रावते यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.  सीसीटीव्ही कॅमेरे, फर्स्ट एड सेंटर, ट्रॉमा केअर सेंटर, रस्त्याचे सेफ्टी ऑडीट, क्रेन, स्पीड गनचा वापर अशा विविध उपाययोजनांची महामार्गांवर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील रस्त्यांवर ७२१ ब्लॅक स्पॉट (अती अपघात होणारी स्थळे) असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदार तथा यंत्रणांकडून संबंधीत ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती करुन घेण्यात यावी व अपघात रोखावेत, अशा सूचना यावेळी मंत्री रावते यांनी दिल्या. रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या खाजगी बसेस, इतर वाहने यांना स्पीड गव्हर्नर लावण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचनाही मंत्री रावते यांनी बैठकीत दिल्या. १०८ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्स सुविधेमुळे अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तातडीची मदत उपलब्ध होऊ लागली आहे, त्यामुळे मागील काही वर्षात रस्ते अपघातातील मृत्यूंना काही प्रमाणात रोखता आले आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची सहावी बैठक आज येथील विधानभवनात मंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन सहआयुक्त महाजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, गृह, आरोग्य आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

एमसईबी वर्कर्स फेडरेशनची गेट मिटींग, शासन विरोधी प्रदर्शन

गोंदिया,दि.21 : प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असून त्यावर कुठलाच तोडगा काढण्यात आलेला नाही. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एमएसई वर्कर्स फेडरेशनच्यावतीने मंगळवारी (दि.१९) महावितरण कार्यालयासमोर गेट मिटींग घेऊन शासन व व्यवस्थापन विरोधी नारेबाजी करून प्रदर्शन करण्यात आले.महावितरण, महापारेषण व महाजेनको या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
कित्येकदा व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले, विविध स्तरावर व्यवस्थापनाशी वाटाघाटी केल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत रोष व खदखदत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला. यासाठी ९ नोव्हेंबर रोजी शासन व व्यवस्थापनास नोटीस देण्यात आली होती.
या आंदोलनांतर्गत फेडरेशनच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विभागीय कार्यालयासमोर, १२ डिसेंबर रोजी सर्कल कार्यालयासमोर व मंगळवारी (दि.१९) झोन कार्यालयासमोर गेट मिटींग घेऊन कामगार जागृती तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी शासन व व्यवस्थापनाविरोधात जोरदार नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला.
याप्रसंगी फेडरेशनचे विवेक काकडे, मंगेश माडीवाले, नरेंद्र डोळस, नितीन नखाते, प्रितम राऊत, विलास वाढई, हिवरकर, रोहीत रामटेके, प्रदीप भोयर, डी.बी.शेंडे, मारोती भोयर, सुभाष बंसोड, पंकज कटकवार, सुरेखा सत्तार, सी.के.चिंधालोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.संचालन विभागीय सचिव अशोक ठवकर यांनी केले. आभार विभागीय सचिव विनोद चौरागडे यांनी मानले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...