Saturday, 9 September 2017

पोलिस जवानांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; 1 जवान गंभीर जखमी

1218_Heli

गडचिरोली,दि.08– कोरची पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कोडगुल पोलिस मदत केंद्रावर कार्यरत असणाऱ्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात आशिष मडावी हा जवान गंभीर जखमी झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटगूल पोलिस मदत केंद्रात कार्यरत अशोक मडावी या जवानाला सुटीवर जायचे होते. मनिष हारामी हा जवान अशोक मडावी यास कोरची येथे सोडून देण्याकरिता मोटारसायकलने निघाला होता. दोघेही मोटारसायकलने कोरचीकडे येत असताना कोसमी क्रमांक २-भटगाव येथील जंगलात साध्या वेशभूषेतील सशस्त्र नक्षलवादी रस्ता पार करीत होते. मोटारसायकलवरील इसम पोलिस असल्याची खात्री पटताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात अशोक मडावी जखमी झाला. जखमी अवस्थेतच मनिष हारामी याने अशोकला कोरचीपर्यंत आणून त्याला तेथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मडावी यांच्यावरील उपचारासाठी हेलीकॉप्टर रवाना केले. मडावी यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन त्यांना हेलीकॉप्टरने नागपुरला नेण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...