उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
देवरी,७- देवरी तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करा व विना अटी आणि शेतावरील यंत्राचे कर्ज त्वरित माफ करा, या मागणीला घेऊन देवरी तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर आज गुरुवारी (ता.७) हजारोंच्या संख्येने उपविभागीय कार्यालयावर धडकले.
अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने देवरी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकèयांना कर्जमाफी साठी सरकारने त्राहीमाम करून सोडले आहे. ऑनलाइनची किचकट प्रक्रिया ही शेतकèयांची डोकेदुखी ठरली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व शेतमजूर मेटाकुटीस आले आहेत. यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीच्या मशागतीसाठी आलेल्या खर्चाने त्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. असे असताना सरकारे गेल्या २०१५-१६ च्या हंगामात तालुक्यातील ६८ गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करूनसुद्धा कवडीची सुद्धा मदत केली नाही. परिणामी, यावर्षी सरकारने सरसकट दुष्काळ घोषित करावे, शेतीयंत्रांसाठी घेतलेले कर्ज माफ करावे आणि त्या ६८ गावातील शेतकèयांना त्वरित पीकविम्याची रक्कम अदा करावी, अशा विविध मागण्यांना घेऊन आज स्थानिक उपविभागीय कार्यालयावर शेतकरी-शेतमजुरांनी मोच्र्याचे आयोजन केले होते.
स्थानिक परसटोला येथून हा मोर्चा काढण्यात आला. तालुका शेतकरी व शेतमजूर संघटनेतील पदाधिकाèयांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रभान सोनबोईर, संघटक रियाज खान, सचिव महेंद्र मोहबंशी, सहसंघटक जीवनलाल सलामे, दिलीप अंबरवाडे,उत्तम मरकाम,रामेश्वर पदाम, रणजित कसाम यांचेसह अनेक पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता. यावेळी देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे, तहसीलदार विजय बोरूडे उपस्थित होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांचे नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
No comments:
Post a Comment